लोकायुक्त कायदा देशाला मार्गदर्शक ठरेल : अण्णा हजारे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 07:37 PM2019-06-11T19:37:22+5:302019-06-11T19:41:23+5:30

देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकायुक्त कायदा केला गेला...

Lokayukta Law will be a guide for the country: Anna Hazare | लोकायुक्त कायदा देशाला मार्गदर्शक ठरेल : अण्णा हजारे 

लोकायुक्त कायदा देशाला मार्गदर्शक ठरेल : अण्णा हजारे 

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिती अधिकार कायद्याप्रमाणेच होईल आदर्शकायदा झाल्यानंतर प्रत्येक राज्याने एक वर्षाच्या आत त्यासाठी लोकायुक्त कायदा बनविला पाहिजेयेत्या पावसाळी अधिवेशनात मसूदा मंजूर होईलनरेंद्र यांच्यापेक्षा देवेंद्र यांचे काम चांगले

पुणे : माहिती अधिकार कायद्या प्रमाणेच लोकायुक्त कायदा देशासाठी आदर्श ठरेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी दिली. 
देशात भ्रष्टाचाराला ब्रेक लावण्यासाठी केलेल्या लोकपाल कायद्यानुसार राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाणेर रस्त्यावरील यशदा येथे या विषयावर होणाऱ्या दोन दिवसीय चर्चेस मंगळवारी (दि. ११) सुरुवात झाली. माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, विश्वंभर चौधरी, शाम असावा, संजय पठाडे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार आणि विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत या वेळी उपस्थित होते. 
राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा यासह विविध मागण्यांसाठी हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हे आंदोलन झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हजारे यांनी हे उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये हजारे यांच्यासह आंदोलनातील त्यांच्या सहकारी सदस्यांचाही समावेश आहे. कायद्याच्या मसुद्यावर यात चर्चा होणार असून, त्यातील शिफारसी विधिमंडळाकडे मंजुरीसाठी पाविल्या जातील. लोकपालच्या नव्या कायद्याप्रमाणे लोकायुक्त कायदा झाल्यास असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य ठरणार आहे. 
याबाबत बोलताना हजारे म्हणाले, देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकायुक्त कायदा केला गेला. मात्र, हा कायदा झाल्यानंतर प्रत्येक राज्याने एक वर्षाच्या आत त्यासाठी लोकायुक्त कायदा बनविला पाहिजे. माहिती अधिकार कायद्या प्रमाणे हा कायदा आदर्श व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कायद्याच्या मसुदा समितीमधे त्यावर चर्चा सुरु आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मसूदा मंजूर होईल. 
-----------------
नरेंद्र यांच्यापेक्षा देवेंद्र यांचे काम चांगले
राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना विचारले असता त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची कामगिरी चांगली असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. 

Web Title: Lokayukta Law will be a guide for the country: Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.