लोकसभा निवडणूक :पुणे आणि बारामतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलासह ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 09:17 PM2019-04-22T21:17:55+5:302019-04-22T21:18:58+5:30

शहरात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रथमच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचे कर्मचारी असा ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़. 

Lok Sabha elections: 8,000 police including central security forces in Pune and Baramati | लोकसभा निवडणूक :पुणे आणि बारामतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलासह ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा निवडणूक :पुणे आणि बारामतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलासह ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

Next

 पुणे : शहरात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रथमच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचे कर्मचारी असा ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़.  त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा बंदोबस्त असणार आहे़.  याबाबत पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी माहिती दिली़.  यावेळी सह आयुक्त शिवाजी बोडखे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते़.  

यंदा पुणे शहरातील बंदोबस्तासाठी बाहेरुन एकूण ५५ अधिकारी आणि ४५० पोलीस कर्मचारी मिळाले आहे. पुणे शहरातील ४५१ इमारतींमध्ये एकूण २ हजार ५०९ बुथवर मंगळवारी मतदान होणार आहे़.  या बुथसाठी २ हजार ४७० पोलीस कर्मचारी व १५४० होमगार्डस यांची नियुक्ती करण्यात आली आहे़.  त्यापैकी १०० बुथ निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी क्रिटीकल घोषित केले आहेत़.  प्रत्येक क्रिटीकल बुथसाठी १ पोलीस कर्मचारी व १ होमगार्डची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे़.   ४ पेक्षा अधिक बुथ असलेल्या इमारतींसाठी तसेच बाहेर १०० मीटर वर पेट्रोलिंग करिता अतिरिक्त पोलीस कर्मचारी ठेवण्यात येणार आहे़.  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस संवेदशील असणाऱ्या  ४१ इमारतींसाठी अतिरिक्त प्रत्येकी १ पोलीस उपनिरीक्षक व सीपीएमएफचे हाफ सेक्शन असणार आहे़.  

मतदानाच्या बंदोबस्तासाठी पाच स्तरावर रचना केली आहे़.  

इन्स्टंट रिस्पॉन्स टीम : प्रत्येक पोलीस ठाण्याची बुथचे संख्येनुसार ३ ते ७ सेक्टरमध्ये विभागणी असे एकूण १२४ सेक्टर्स करण्यात आले़.  प्रत्येक सेक्टरमध्ये १ पोलीस उपनिरीक्षक व ३ पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करतील़. 

 

पॉम्ट रिस्पॉन्स टीम : प्रत्येक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वाहनांमध्ये ३ कर्मचारी याशिवाय त्यांचे सोबत स्वतंत्र वाहनांमध्ये १ सहायक निरीक्षक व ५ पोलीस कर्मचारी असा मिनी स्ट्रायकिंग असेल़. 

 

क्राईम रिस्पॉन्स टीम : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा त्वरीत तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक व शोध पथकातील १ सहायक निरीक्षक व ४ पोलीस कर्मचारी असतील़ अशी ३० पथके असतील़ . 

 

झोनल रिस्पॉन्स टीम : प्रत्येक दोन पोलीस ठाण्यांसाठी १ असे १५ सहायक पोलीस आयुक्त असणार असून त्यांच्यासोबत १ उपनिरीक्षक व १० पोलीस कर्मचारी असा फोर्स असेल़.

  • २  अपर पोलीस आयुक्तांबरोबर प्रत्येकी १ उपनिरीक्षक व १० पोलीस कर्मचारी असा फोर्स असेल़.  सहपोलीस आयुक्तांबरोबर एक पोलीस निरीक्षक व १० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल़.  
  • पाचही परिमंडळाच्या पोलीस उपायुक्ताकडे १ अधिकारी व २० कर्मचारी यांचे पथक असेल़. याशिवाय नियंत्रण कक्षामध्ये १ अधिकारी व १५ कर्मचाऱ्यांचे प्रत्येक ५ पथके असतील़.  
  • निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तांच्या हद्दीमध्ये एकूण ३१ भरारी पथक व ३१ स्थीर सर्व्हेलन्स पथके आचारसंहिता लागल्यापासून तैनात करण्यात आली आहेत़. 
  • याशिवाय शहरात येणाऱ्या १४ प्रमुख रस्त्यांवर १४ ठिकाणी चेकनाके २४ तास कार्यरत आहेत़.  आतापर्यंत आचार संहिता भंगाचे ५ गुन्हे दाखल असून ते प्रामुख्याने विनापरवाना मिटिंग घेणे, पत्रकार परिषद घेणे अशा स्वरुपाचे आहेत़.  

स्टॉगरुमसाठी तीन स्तरीय बंदोबस्त

मतदान झाल्यानंतर सर्व इव्हिएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवण्यात येणार आहे़.  या ठिकाणी सर्वात आत केंद्रीय सुरक्षा दलाची ३० जणांची तुकडी असेल़.  त्यानंतरच्या सर्कलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी व त्यानंतर सर्वात बाहेर शहर पोलीस दलाचे पथक २४ तास तैनात करण्यात येणार आ. हे़ याशिवाय सीसीटीव्हीची निगराणी राहणार आहे़.  

Web Title: Lok Sabha elections: 8,000 police including central security forces in Pune and Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.