लोकसभा निवडणूक : मावळमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:25 PM2019-04-20T13:25:20+5:302019-04-20T13:27:39+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे..

Lok Sabha election: women will be Decision-makers in maval due to increasing percentage of female voters | लोकसभा निवडणूक : मावळमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक

लोकसभा निवडणूक : मावळमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक

googlenewsNext
ठळक मुद्देमावळ मतदारसंघात २००९च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी केले होते मतदान

- नारायण बडगुजर

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००९ मध्ये ४६.९८, तर २०१४ मध्ये ४६.९७ टक्के महिला मतदार होत्या. २०१९ मध्ये म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ४७.६४ महिला मतदार आहेत. अर्थात गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा मावळ मतदारसंघातील महिलांचा टक्का वाढला आहे.  
मावळ मतदारसंघात २००९ मध्ये १६,०४,८८६ मतदार होते. त्यात ७,५३,९१४ महिला, तर ८,५०,९७२ पुरुष मतदार होते. २०१४ मध्ये १९,५३,७४१ मतदार होते. त्यात ९,१७,७७० महिला तर १०,३५,९६१ पुरुष मतदार होते. 
यंदा २२,२७,७३३ मतदार असून, यात १०,६१,३१३ महिला, तर ११,६५,७८८ पुरुष मतदार आहेत. तसेच ३२ तृतीयपंथी तर ६०० सर्व्हिस अर्थात पोस्टल मतदार आहेत.
.
0% तृतीयपंथी मतदारांची नोंद २०१४ पासून करण्यात आली. त्यामुळे २००९ मध्ये मतदारयादीत तृतीयपंथी मतदाराची नोंद नव्हती.
1% २०१४ मध्ये मावळ मतदार संघात १० तृतीयपंथी मतदार होते. यातील एकाच मतदाराने मतदान केल्याने त्यांची टक्केवारी एक होती.
1%  महिला मतदारांचा टक्का गेल्या निवडणुकीत किंचित घटला होता. मात्र २००९ आणि २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांची संख्या एका टक्क्याने वाढली आहे. तसेच तृतीयपंथी मतदार वाढले असून पुरुष मतदारांचा टक्का घटला.
...........
लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत ४२.९६ टक्के महिलांनी मतदान केले होते. मात्र २०१४ मधील निवडणुकीत ५७.४६ टक्के महिलांनी मतदान केले होते. अर्थात २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी मतदान केले होते. यंदा महिला मतदारांचा टक्का वाढला असल्याने अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती आली आहे. 

Web Title: Lok Sabha election: women will be Decision-makers in maval due to increasing percentage of female voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.