भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 06:30 PM2018-08-16T18:30:14+5:302018-08-16T18:30:56+5:30

भारतीय व्यवहार कोशामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे.

Language adds to the community: Governor C. Vidyasagar Rao | भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव

भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव

Next
ठळक मुद्देदेशातील विविध भागात सहा वर्षे प्रवासातून कोश साकार

पुणे : भारतामध्ये विविध भाषा आणि संस्कृती अनेक वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. भाषा ही समाजाला जोडण्याचे काम करते. त्यामुळे देशातील सोळा भाषांतील चाळीस हजारांहून अधिक शब्द असलेला भारतीय व्यवहार कोश देशी भाषांचे ज्ञान मिळविण्यासाठी उपयोगी ठरेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय विचार साधना, पुणे निर्मित तसेच दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोषाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल राव यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल, सचिव राजन ढवळीकर, डेक्कन अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रसाद जोशी, हरिभाऊ मिरासदार या वेळी उपस्थित होते.
राज्यपाल राव म्हणाले, भारतीय व्यवहार कोशामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे. यातील कोणत्याही भाषेतील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हा कोश उपयोगी पडेल. कोशाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणे म्हणजेच संपादक नरवणे यांना अभिवादन करण्यासारखे आहे. कारण, त्यांनी सहा वर्षे देशातील विविध भागात प्रवास करीत कोश साकारला. त्यानंतर त्यांनी अनेक भाषा तज्ज्ञांची भेट घेऊन कोश परिपूर्ण बनवला. 
नरवणे यांच्या पत्नी कविता नरवणे यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. किशोर शशितल यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद जोशी यांनी पुस्तक परिचय करुन दिला. राजन ढवळीकर यांनी आभार मानले. राजेंद्र संगवी, दिगंबर घाटपांडे, शरद घाटपांडे, शरद थिटे, अस्मिता आसाट या वेळी उपस्थित होते.

Web Title: Language adds to the community: Governor C. Vidyasagar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे