माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:37 PM2018-11-27T12:37:44+5:302018-11-27T12:41:38+5:30

लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट..

The lack of credibility of readers due to excessive media: Shekhar Gupta | माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी होतेय : शेखर गुप्ता 

Next
ठळक मुद्देदिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी राज्यकर्ते प्रयत्नशील फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ

पुणे : वाचक आणि दर्शक यांची सोयीनुसार विभागणी करण्यात माध्यमांनी धन्यता मानली. राजकारण्यांना हे हवेच होते. त्यांनी त्याला अधिक पाठबळ देत माध्यमांना आपल्या तालावर नाचवत लोकांच्या विश्वासार्हतेशी तडजोड करण्यास भाग पाडले. याचा गंभीर परिणाम माध्यमांवर झाला. त्यामुळेच वेगवेगळे इझम तयार झाले. एकूणच माध्यमांच्या अतिरेकामुळे वाचकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले. तर वाचकांनी देखील माध्यमांना गृहीत धरणे हा त्यांच्यासमोरील मोठा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. 
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटी यांनी आयोजिलेल्या दुसऱ्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानाचे वक्ते म्हणून सोमवारी गुप्ता बोलत होते. त्यांनी "आज सर्वाधिक धोका कशाला ? प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याला की बातमीच्या सार्वजनिक विश्वासार्हतेला ? याविषयावर विचार व्यक्त केले. डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रा. अमिताव मलिक, डॉ. भामा वेंकटरमणी, प्रा. रुची जग्गी, डॉ. लतिका पाडगावकर आदी या वेळी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, आता माध्यमामध्ये कबड्डीचा खेळ सुरू झाला आहे. यात जो तो एकमेकांना आपापल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी वाचकांच्या विश्वासार्हतेचा विचार करून आपले पाय खंबीरपणे रोवून उभे राहण्याचे धाडस माध्यमांना दाखवावे लागेल. आपल्यापेक्षा लोक अधिक हुशार आणि जागृत आहेत याचे भान माध्यमांनी ठेवल्यास बरे होईल. सरकारने माध्यमांची गळचेपी करण्याइतकेच हेही संकट वेळीच ओळखून माध्यमांनी त्यावर काम केले पाहिजे. माध्यमांची लोकांच्या मनातील प्रतिमा डागाळली जावी, यासाठी अनेकदा जगभरातील राज्यकर्ते प्रयत्न करताना दिसून येतात.'
आपण स्वत:चीच टर उडविण्यात हातभार लावत असल्याने आणि हे न आल्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत चालली आहे. लोकांना माध्यमांचे आणि माध्यमे मांडत असलेल्या भूमिकांचे गांभीर्यच वाटेनासे न होणे, हे माध्यमांच्या पुढील मोठे संकट असल्याचेही गुप्तां यांनी यावेळी सांगितले. 
.....................................
* फेक न्यूजची भीती बाळगण्याचे कारण नाही कारण ते ओळखण्यास वाचक समर्थ आहेत. प्रस्थापित माध्यमातून ज्यावेळी फेक न्यूज सातत्याने दिल्या जातात अशावेळी त्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून भविष्यात फेक न्यूजच्या प्रभावाला वाचकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. अशी टिप्पणी गुप्ता यांनी केली.

Web Title: The lack of credibility of readers due to excessive media: Shekhar Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.