चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:01 PM2018-10-23T22:01:10+5:302018-10-23T22:04:15+5:30

‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला.

Kojagiri pornima celebrated at Lokmat office | चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात

चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात

googlenewsNext

पुणे :
      मोबाईल नेटने युग नवं आणलं
     आली मैना पुढं तिने दु:खच मांडलं
      लागल्यात जुन्या पोपटांना मिरच्या झोंबायला
      जेव्हा धाडस करून मैना मीटू मीटू बोलायला
      शुटींग करताना ’तनु’ला त्यांनी
      हैराण केले ’नाना’ तऱ्हांनी 
      लागली त्यांची तनुश्री दत्तापायी  पाप फेडायला

तनुश्री दत्ता ने  ‘मीटू’ च्या माध्यमातून नाना पाटेकरांच्या कृत्यावर आवाज उठविल्यानंतर समाजात सर्वत्र  ‘मी टू’ चे वादळ घोंघावू लागले आहे,
त्यावर मार्मिक भाष्य करणा-या या या कवितेसह नोटाबंदी, पेट्रोल दरवाढ अशा विडंबनात्मक आणि प्रहसनात्मक कवितांच्या एकेक फुलो-यातून  कवितेचा गुलदस्ता उलगडला. शीतल चंद्राच्या प्रकाशात शब्दसुमनांच्या बरसातीतून ही काव्यमैफल सजली.
निमित्त होते, ‘लोकमत’तर्फे कोजागरी पोर्णिमेच्या पूर्वरात्री आयोजित काव्यमैफलीचे.  ‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात
पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला.शब्दांचे विविध रंग खुलवत त्यांनी दोन तास मैफली जागवली.
      शब्द माझे सूर तुझे
     गीत मी गाऊ का?
     हात माझे गाल तुझे
     कानाखाली देऊ का?

या विनोदात्मक कवितेमधून बण्डा जोशी यांनी मैफलीत पहिल्याच बॉलला सिक्सर मारला. मुली किती कडक होत्या? हे दर्शविणा-या याकवितांनी हसूनहसून पुरेवाट केली.
’ बाबा कालचीच रात,येत होते मी मुकाट
  आला आडवा हारस्त्यात मेला वाट सोडेना
  मवाली हा झाला होता असा वेडापिसा
  हात धरला असा कळ जाईना
आले धकलून धावतपळत घरी आले
याची खोड मोडा याचे वाजवा की बारा

गल्लीतून जात असताना छेड काढलेल्या एका मुलीने बाबांकडे तक्रार केली आणि वडिलांना घेऊन आली ते तिने शब्दातून कसे कथन केले हे  ‘आता वाजले की बारा’ या गीताच्या चालीत त्यांनी  विडंबनात्मक कविता सादर केली.बापाने त्या पोराची बेदम धुलाई केल्यानंतर पोराच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ’अहो अस काय करता बदाबदा मारता सुजली पाठ माझी’...हे सादर करतानाउपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर खास सैगलच्या आवाजात  ‘जब सर ही तुट गया हम जीके क्या करे? या प्रहसनात्मक कवितेने रंजकता आणली.

उरात होते धडपड बंदी नोटांवर आली
हजार पाचशे नोटा बदलून घ्या आज्ञा मोंदीची झाली
आधी अधीर झालो या बधिर झालोया
अन ब्लँक मनी व्हाईट करता जेरीस आलोया

अन उरतोय भुंगाट  पळतोय चिंगाट अंगलट आलया
अवैध मार्गाने पैसा कमावणा-यांची मोदींनी  ‘नोटाबंदी’ करून कशी वाट लावली ही विडंबनात्मक कविता  ‘झिंगाट’ स्टाईलमध्ये कवी अनिल दीक्षित यांनी सादरकरून वातावरणात चांगलीच रंगत आणली. ‘ पेट्रोल-डिझेल दरवाढीने चांगलाच धूर काढला, हात कसा लावू आता गाडीला,
प्रेयसीला म्हटल कसं फिरवू ग, पेट्रोल परवडेना कसं फिरवू ग....त्यावर तिने पेट्रोलपंपवाला गटवला आणि मला मेमो धाडिला....असे सांगताच
उपस्थितांमध्ये हशा पिकला. नवरा बायको च्या प्रेमावर आणि भांडणावरच भालचंद्र कोळपेकर यांनी थेट बोट ठेवले.
नवरा म्हणाला बायकोला
               तू परीसारखी दिसतेस
              त्यावर ती म्हणाली
              अहो, एवढी घ्यायची नसते
               मी मह्णालो तसल काही मला चालत का?
ती म्हणाली, बिना घेता बायकोला कुणी असं म्हणत का?

’ घरोघरी मातीच्याच चुली’ जणू याचाच प्रत्यय अनेकांना कवितेमधून आला. नवरा बायकोच्या भांडणाचे फायदे तोटेही त्यांनी काव्यपंक्तीतून उलगडून सांगितले.                  

Web Title: Kojagiri pornima celebrated at Lokmat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.