चाकण : अत्यंत चुरशीच्या झालेल्या नाणेकरवाडी-चाकण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार किरण वसंतराव मांजरे हे ७४१ मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश ज्ञानेश्वर खराबी यांना पराभूत करून या जिल्हा परिषद गटावर प्रथमच शिवसेनेचा झेंडा रोवला. विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनी आपला बालेकिल्ला अखेर शाबूत ठेवला. निवडणूक निर्णय अधिकारी हिंमत खराडे यांनी मांजरे यांना विजयी घोषित केले.
माजी आमदार दिलीप मोहिते व विद्यमान आमदार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
किरण मांजरे यांना ८,०४६ मते, तर प्रकाश खराबी यांना ७,३०५ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार अमोल गुलाबराव पवार यांना ६,३२० मते तर भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. किरण दशरथ झिंजुरके यांना २,०८० मते मिळाली. अपक्ष उमेदवार पांडुरंग धोंडिबा गोरे यांना ६७७, गौतम किसन वडवे यांना ५७० व जयश्री शंकर सोनवणे यांना ४९ मते मिळाली. १०८ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. मांजरे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.