अनैतिक संबंधाच्या संशयाने अपहरण करून एकाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:57 PM2018-04-21T13:57:40+5:302018-04-21T13:57:40+5:30

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडला.

kidnapping and hitting man due to suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयाने अपहरण करून एकाला मारहाण 

अनैतिक संबंधाच्या संशयाने अपहरण करून एकाला मारहाण 

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी चार जणांच्या टोळक्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडला. याप्रकरणी चार जणांच्या टोळक्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक, आदिल, जुबेर आणि जेम्स यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण बजरंग मोरकडे (वय २७ रा. पिंपळे गुरव) याने फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण हा घरा बाहेर उभा होता. त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने त्याला कारमध्ये बसविले. त्याला कामशेत येथे नेत शिवीगाळ करुन त्यास मारहाण केली. या दरम्यान त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारीची चावी काढून घेतली. तसेच मोरकडे यांना तेथेच सोडुन हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांपैकी एकाच्या नातेवाईक महिलेशी लक्ष्मण याचे अनैतिक संबंध असल्याने अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 
...............

Web Title: kidnapping and hitting man due to suspicion of immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.