सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खुराणा शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:51 PM2018-05-26T18:51:52+5:302018-05-26T18:51:52+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थ्यांना प्रतिष्ठेची खुराणा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

khurana scholarship to savitribai phule university students | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खुराणा शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खुराणा शिष्यवृत्ती

Next

पुणे :  केंद्र शासनाच्या बायाेटेक्नाॅलाॅजी विभागाच्या वतीने इंडाे युएस सायन्स अाणि टेक्नाॅलाॅजी फाेरम (अाय.यु.एस.एस.टी.एफ) अाणि विनस्टेप या संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणारी खुराणा शिष्यवृत्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थ्यांना प्राप्त झाली अाहे. विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थीनी प्रिती शेनाॅय अाणि वडगावच्या सिंहगड काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अाॅफ बायाेटेक्नाॅलाॅजीचा विद्यार्थी अभिषेक देशमुख यांना ही शिष्यवृत्ती मंजूर झाली अाहे. देशभरातून शिष्यवृत्ती मिळालेल्या 55 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील या दाेन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली अाहे. रसायनशास्त्र अाणि जीवशास्त्र विभागातील उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळताे. 


   ही शिष्यवृत्ती मिळाणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी अाॅफ विस्काॅन्सिन- मॅडिसन या अमेरिकेतील विद्यापीठात अाणि संलग्न इतर विद्यापीठांमध्ये संशाेधन करण्याची संधी प्राप्त हाेते. त्यानुसार प्रिती शेनाॅय हिला युनिव्हर्सिटी अाॅफ विस्काॅन्सिन- मॅडिसन तर अभिषेक देशमुखला युनिव्हर्सिटी अाॅफ फ्लाेरिडा इथे संशाेधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली अाहे. 


    मे ते जुलै 2019 मध्ये हे दाेन्ही विद्यार्थी संशाेधनासाठी अमेरिकेला जातील.  सुमारे 10 ते 12 महिन्यांसाठी संशाेधन करताना त्यांना शिक्षावतेन, विमान प्रवास खर्च अाणि अाराेग्य विमा या शिष्यवृत्ती अंतर्गत मंजूर झाला अाहे. अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ. स्मिता झिंजार्डे यांनी दिली अाहे. 
 

Web Title: khurana scholarship to savitribai phule university students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.