पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:11 PM2018-09-25T20:11:05+5:302018-09-25T20:19:06+5:30

बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे.

kalagram will be constructed in P. L. Deshpande Garden | पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

Next
ठळक मुद्देसाडेतीन एकरमध्ये ६ कोटींचा प्रकल्प  कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणारनिविदा पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेपेक्षा २४.८६ टक्के कमी

पुणे: सिंहगड  रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानात महापालिकेच्या वतीने  कलाग्राम उभारण्यात येणार आहे. उद्यानातील तब्बल साडे तीन एकरमध्ये ६ कोटींचा प्रकल्प असून, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी ५६ लाख ३५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    पुणेकरांना, पर्यटकांना देशभरातील विविध राज्यांच्या लोककला व ग्रामीण कलासंस्कृती एकाच छताखाली पाहता यावा, यासाठी  सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. याबाबत मुळीक यांनी सांगितले , पु.ल.देशपांडे उद्यानाताली ३५ एकर जागेपैकी साडे तीन एकरमध्ये हे कलाग्राम उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्प ६ कोटी रुपयांचा असून, यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपये व खासदार अनिल शिरोळे यांनी स्थानिक विकास निधीतून ७५ लाख रुपये कलाग्राम प्रकल्पासाठी दिले आहेत. 
    सिंहगड रस्त्यांवरील पानमळा येथील ३५ एकर जागेत महापालिकेने साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उद्यान विकसित केले आहे. जपानी शैलीचे गार्डन, मोगल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन तीन टप्प्यात करण्यात आले होते. यापैकी पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून तिस-या टप्प्यात कलाग्रामची निर्मिती करण्यात येणार आहे.
बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. विविध राज्यांतील लोककला व ग्रामीण कलासंस्कृतीची एकाच ठिकाणी माहिती मिळणार आहे. हौशी व नवोदीत कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी प्रशासनाने निविदा प्रकिया राबविली होती. यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या. त्यापैकी मंगलमूर्ती डेव्हलपर्स यांची निविदा पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेपेक्षा २४.८६ टक्के कमी दराने आली. ती सर्वात कमी होती. त्यामुळे या ठेकेदाराकडून ५६ लाख ३५ हजार रुपयांचे काम करून घेण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Web Title: kalagram will be constructed in P. L. Deshpande Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.