जुन्नर ‘विशेष पर्यटन क्षेत्र’, ३ हजार कोटींचा प्रस्तावित आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:25 PM2018-03-22T15:25:26+5:302018-03-22T15:25:26+5:30

साधारण ३ हजार कोटींच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये दार्या घाट, बिबट सफारी, लेण्या, गडसंवर्धन, मंदिरे, समाधिस्थळे यांच्या विकासाला चालना देऊन या सर्व स्थळांना जोडणारे रस्ते होणार आहेत़.

Junnar special tourism sector, proposed plan of Rs. 3000 crores | जुन्नर ‘विशेष पर्यटन क्षेत्र’, ३ हजार कोटींचा प्रस्तावित आराखडा

जुन्नर ‘विशेष पर्यटन क्षेत्र’, ३ हजार कोटींचा प्रस्तावित आराखडा

googlenewsNext
ठळक मुद्देमॉडेल तालुका’ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनोदय विकासाला चालना देऊन या सर्व स्थळांना जोडणारे रस्ते होणार
रायणगाव : जुन्नर तालुका ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केला आहे़ राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केले. त्यामुळे राज्यातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून जुन्नर आता ओळखला जाईल. पर्यटकविकासाला चालना देण्यासाठी २,५०० ते ३,००० कोटींचा विकास आराखडा या पर्यटन क्षेत्राच्या दर्जामुळे मिळेल़.जुन्नर राज्यातील ‘मॉडेल तालुका’ करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला असल्याने पुढील काळात राज्याचा मॉडेल तालुका हा जुन्नर राहील. तसेच, केंद्र सरकारने पाच ‘मॉडेल फोर्ट’ (प्रायोगिक किल्ले) घेतले आहेत. त्या किल्ल्यांमध्ये शिवनेरी किल्ल्याचा समावेश असल्याने या तालुक्याच्या विकासाला आणखीन चालना मिळेल, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली़ .सोनवणे म्हणाले, की महाराष्ट्र राज्यात पहिला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून जुन्नरचा समावेश झाल्याने या तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली आहे़.साधारण ३ हजार कोटींच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये दार्या घाट, बिबट सफारी, लेण्या, गडसंवर्धन, मंदिरे, समाधिस्थळे यांच्या विकासाला चालना देऊन या सर्व स्थळांना जोडणारे रस्ते होणार आहेत़. शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय होईल.आधुनिक क्रीडा संकुले सुरू करण्यात येतील. त्यात विविध प्रकारचे रोप-वे प्रस्तावित आहेत़. आधुनिक खेळांच्या माध्यमातून संकुले सुरू होणार आहेत. सर्व धरणांमध्ये नौकानयन, जलक्रीडेच्या माध्यमातून पाण्याखाली जाऊन तळ पाहता येईल, अशा स्वरूपाचे खेळ असतील. याबाबत पाठपुरावा केल्याने बुधवारी (दि.२१ मार्च ) शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती आमदार सोनवणे यांनी दिली़.जुन्नरचे पर्यटन पूर्ण झाल्यानंतर तो देशाच्या विकास आराखड्यामध्ये जोडला जाणार आहे़. माणिकडोह येथे अत्याधुनिक रेस्ट हाऊस, हॉटेलची निर्मिती तसेच स्वच्छतागृहे आदींचा समावेश या विकास आराखड्यात असेल़. लवकरच संवर्धन करणाऱ्या संस्था,शिवाजी ट्रेंड शासनाचे विविध विभाग यांची प्रथम तालुकास्तरावर बैठक घेऊन नंतर पर्यटन विकास आराखड्याचा मास्टर प्लॅन व्हिडीओद्वारे तयार करून प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन शासनाकडे सादर केले जाणार आहे़.जुन्नर तालुक्यात जीएमआरटी व विदेश संसार निगम हे दोन प्रकल्प असल्याने तालुक्यात औद्योेगिक वसाहतीला चालना मिळाली नाही़. मोठे कारखाने या तालुक्यात येऊ शकले नसल्याने या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी या तालुक्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती़. सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा मिळालेला आहे.तथापि, राज्यातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून मानही जुन्नरला मिळणार आहे़.नैसर्गिक वैभवअष्टविनायक गणपतींपैकी लेण्याद्री व ओझर ही देवस्थाने, हेमाडपंती तीन पुरातन मंदिरे, तसेच तीन समाधी मंदिरे इतर महत्त्वाची मंदिरे, नाणेघाट, घाटघर, दार्या घाट, आणेघाट येथील प्रसिद्ध धबधबे, तसेच नद्यांंची उगमस्थाने या ठिकाणी आहेत. जागतिक महादुर्बीण असलेले जीएमआरटी केंद्र, आर्वी येथील विक्रम उपग्रह, गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल कोकणकडे, माणिकडोह गावातील कुकडी नदी, पुरातन काळात भूकंप झालेल्या उदे्रकाची राख, कृषी पर्यटन केंद्र, नारायणगाव येथील तमाशापंढरी, आशिया खंडातील सर्वांत पहिली वाई नदी, नैसर्गिक पूल असलेले आठवडेबाजार तसेच विकासासाठी नैसर्गिकरीत्या जुन्नर तालुक्याला लाभलेले वैभव या सर्वांची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस, पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जयकुमार रावल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी जुन्नरला अनुकूलता दर्शवली़.

Web Title: Junnar special tourism sector, proposed plan of Rs. 3000 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.