सोशल मीडियावर कलाकृतींच्या दुनियेची सफर; उपलब्ध होणार लहान मुलांशी संबंधित साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:25 PM2018-01-30T13:25:34+5:302018-01-30T13:29:37+5:30

वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Journey of art world on social media; Content related to children who will be available | सोशल मीडियावर कलाकृतींच्या दुनियेची सफर; उपलब्ध होणार लहान मुलांशी संबंधित साहित्य

सोशल मीडियावर कलाकृतींच्या दुनियेची सफर; उपलब्ध होणार लहान मुलांशी संबंधित साहित्य

Next
ठळक मुद्देचित्रपटांच्या तुलनेत लघुपट हे अभिव्यक्तीचे नवीन आणि सशक्त माध्यम लोकप्रियतेच्या वाटेवरसंगीत, शिल्प, नृत्य, चित्र, नाट्य आदींशी संबंधित साहित्य, व्हिडिओ करण्यात आला समाविष्ट

पुणे : सोशल मीडियामधून मनोरंजन आणि माहितीचा खजिना खुला झाला असताना, त्यातून नेमके काय निवडावे, हा प्रश्न प्रत्येक कलाप्रेमीला पडत असतो. लघुपट, वेब सिरीज, नाटक यातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सद्य:स्थितीवर भाष्य होत असते. या कलाकृतींचा आस्वाद घेऊन समृद्ध होण्यासाठी वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. अचूक निवड कशी करावी, यासाठी ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
चित्रपटांच्या तुलनेत लघुपट हे अभिव्यक्तीचे नवीन आणि सशक्त माध्यम लोकप्रियतेच्या वाटेवर आहे. मात्र, स्मार्ट फोन वापरणाºया अनेकांना मनोरंजनाचे हे माध्यम माहीत नसते. उत्तम लघुपट कवितेसारखे कमी वेळात उत्कृष्ट आशय आणि अनुभव मांडतात. यांची निर्मितीमूल्ये, तांत्रिक बाबी समजून घेण्याच्या दृष्टीने या वेब पोर्टलवर कलाप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  शिवा जोशी आणि मुक्ता चैैतन्य यांनी या वेब पोर्टलसाठी पुढाकार घेतला.
चत्ौन्य म्हणाल्या, ‘लघुपट, सिनेमा, नाटक, वेब सिरीज याविषयी वाचायला, पाहायला मिळेल, असे व्यासपीठ मराठीत उपलब्ध नाही. वेब पोर्टलच्या माध्यमातून रसिकांसाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. प्रजासत्ताकदिनाचे औैचित्य साधून, वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दृकश्राव्य माध्यमातून संगीत, शिल्प, नृत्य, चित्र, नाट्य आदींशी संबंधित साहित्य, व्हिडिओ आणि इतर ऐवज येथे समाविष्ट करण्यात आला आहे.
साहित्य, कला, संस्कृतीचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Journey of art world on social media; Content related to children who will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.