आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:46 PM2018-05-02T16:46:52+5:302018-05-02T16:49:04+5:30

२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका 

IT worker getting more stressful | आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

googlenewsNext
ठळक मुद्देवरवर सुखी दिसणाऱ्या आय टी क्षेत्रातील कर्मचारी तणावात !सुमारे ६७ टक्के कर्मचाऱ्यांना नैराश्य, दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ 

पुणे :  आय टी कंपनीत काम करून काही लाखात कमावणारे तरुण सुखी आणि समाधानी असतात असा तुमचा समज असेल तर ते चुकीचे आहे. आज आयटीतले कर्मचारी ऐटीत नाहीत तर तणावात असल्याचे समोर आले आहे. २०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे.आय टीमध्ये काम करणं म्हणजे चकचकीत ऑफिस, ए. सी. मध्ये बसून काम, लाखात पगार, शरीराला कष्ट नाहीत अशी संकल्पना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आजही तरुणांना आकर्षण आहे. पुण्यासारख्या शहरात तर अनेकजण फक्त याच क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. पण इथे काम करणं आणि मुख्य म्हणजे टिकून राहणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. डॉ वंदना घोडके यांनी सध्या जवळपास दररोज निराश असलेले आय टीमध्ये काम करणारे तरुण येत असून हे अतिशय धक्कादायक असल्याचे नमूद केले. त्यातील अनेकांची शारीरिक स्थिती तर चिंताजनक आहेच पण मानसिक स्थिती अधिक भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्यभावना आणि आत्मविश्वासाची कमतरता यांनी त्यांना ग्रासले असून हे अनेकांना समुदेशकाकडून तर काहींना मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याची वेळ आल्याचे त्या म्हणाल्या. 

 

ही आहे सद्यस्थिती 

१ )या क्षेत्रात कॉस्ट कटिंग (कर्मचारी कमी करणे)याचे प्रमाण वाढत असल्यामुळे दररोज माझी नोकरी सुरक्षित नाही या भीतीखाली अनेकांना निद्रानाश आणि नैराश्याने पछाडले आहे.

२)घर किंवा गाडी अशा कारणांसाठी घेतलेले कर्ज, उच्च्भ्रू राहणी यामुळे अनेकांना दुसरीकडे नोकरी करण्याची कल्पनाही सहन होत नाहीये.

३) दुसरीकडे आठवड्यातले पाच दिवस कुटुंबासोबत संवाद नसल्याने एक प्रकारची दरी निर्माण होत आहे.त्यामुळे आपण एकटेच आहोत, सोबत कोणीही नाही अशा मनस्थितीचे प्रमाण वाढत आहे. 

४)नवराबायको दोघेही एकाच क्षेत्रात असतील तर त्यांचेही वैवाहिक जीवन अडचणीत येत असून घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ संवादाच्या अभावामुळे वैवाहिक नाते  संपुष्टात येण्याच्या संख्येत वाढ. 

५)ऑफिसमधला ताण वाढत असून त्यातून रिलीफ मिळावा म्हणून अनेकजण सिगारेट, दारूसारख्या व्यसनांना जवळ करत आहेत.

 

उपाय :

१)स्वतःला वेळ न देण्याची गरज असून आठवड्यातून काही तास एखादा छंद जोपासा. त्यातून मानसिक शांती मिळते. 

२)कुटुंबात संवाद अतिशय महत्वाचा असून घरातील आई वडिलांपासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येकाशी आवर्जून बोला. यातून अनेक प्रश्न सुटतील. 

३)तुमच्या जोडीदाराला दिवसभरात होणाऱ्या घटना, येणाऱ्या अडचणी, घुसमट सारे काही सांगा आणि त्याचे किंवा तिचेही अनुभव ऐका. यातून मित्रत्वाचे नाते निर्माण होईल. 

४)पबला जाणे किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणे या पलीकडे वीक एन्डचा प्लॅन करत कुटुंबासोबत सहलीला जाणे, मुलांना घेऊन सिनेमाला जाणे किंवा एकत्र दिवस घालवणे अशा दिसायला छोट्या पण आनंद देणाऱ्या गोष्टी करा. 

५)दररोज योगासन आणि त्यातही ध्यान-धारणा कराच. त्यामुळे मनःशांती मिळते. 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: IT worker getting more stressful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.