त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:19 PM2018-06-13T18:19:04+5:302018-06-13T18:19:04+5:30

रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेदीला येणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

It was not even dreamed that the issue about Pagdi | त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

पुणे :  रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर  पगड्या बघायला आणि खरेदीला येणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. 
      रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जून छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही पगडी कुठून घेण्यात आली याबद्दल माहिती  असता बुधवार पेठेतील मुरुडकर झेंडेवाले या दुकानाचा शोध लागला. या दुकानात अनेक वर्षांपासून पगड्या तयार केल्या जात असून बाजीराव मस्तानीसारख्या चित्रपटातही इथल्या पगड्या वापरल्या गेल्या आहेत. इथे पुणेरी आणि फुले पगडी व्यतिरिक्त शिंदेशाही पगडी, बत्ती पगडी, तुकाराम पगडी, मराठमोळा फेटा, पेशवाई पगडी, मावळे पगडी अशा विविध पगड्या मिळतात. याच दुकानातून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीची पुणेरी पगडी  आणि नंतरची फुले पगडी आणण्यात आली होती. 
        याबाबत मुरुडकर यांना विचारले असता, त्यांनी कायमच आमच्याकडे सत्कार समारंभांसाठी पगड्या खरेदी करण्यासाठी गर्दी असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी पुणेरी पगड्या खरेदी करण्यात आल्या हेच मुळात माहिती नसल्याचे सांगितले.नंतर घाईघाईत फुले पगडी घेण्यासाठी आलेले कार्यकर्तेही भर सभेतून धावतपळत आल्याचे माहिती नव्हते.मात्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर आमच्या दुकानाचे नाव आणि पगडीची चर्चा होत असल्याचे काहींनी सांगितले. पुढचे दोन दिवस तर पगडीवरून इतकी चर्चा, लेख, मुलाखती बघायला मिळाल्या की या घटनेवरून एवढी चर्चा होईल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या पगडी प्रकारानंतर पगड्या बघायला आणि खरेदी करायला अधिक गर्दी होत असल्याचे त्यांनी आवार्जून सांगितले. येणारे ग्राहक प्रत्येक पगडीसोबत त्याची वैशिष्टयही विचारत असल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. 

Web Title: It was not even dreamed that the issue about Pagdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.