हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:04 PM2018-12-19T18:04:43+5:302018-12-19T18:06:16+5:30

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्राे मार्गाचे नुकताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. या मेट्राेमार्गाबाबत आयटीयन्सच्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या.

IT employees saying metro is starting is good thing but.... | हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण...

हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण...

Next

पुणे : पुण्यातल्या वनाझ ते रामवाडी या मेट्राेमार्गाच्या बांधणीला सुरुवात झाली असताना काल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्राेमार्गाचे भूमिपूजन केले. या मार्गामुळे हिंजवडीमध्ये हाेणारी ट्रॅफिक कमी हाेण्यास मदत हाेईल असे बाेलले जात आहे. हिंजवडीमध्ये हजाराे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असल्याने येथे येणाऱ्यांची संख्या लाखाेंमध्ये आहे. मेट्राेमुळे हिंजवडीमध्ये हाेणाऱ्या ट्रॅफिक जॅममध्ये फरक पडेल का तसेच आयटीयन्स मेट्राेचा वापर करतील का याबाबत आम्ही येथे काम करणाऱ्या आयटीयन्सशी संवाद साधला. 

    पुण्यात सध्या वनाझ ते रामवाडी या मेट्राेमार्गाचे काम जाेरात सुरु आहे. 2019 पर्यंत पुण्यात पहिली मेट्राे धावू लागेल अशी ग्वाही खुद्द नरेंद्र माेदी यांनी दिली. या मेट्राेमुळे पुण्यातील वाहतूक काेंडी कमी हाेण्यास मदत हाेईल असे बाेलले जात आहे. पुण्यातील सर्वात जास्त ट्रॅफिकचा भाग म्हणून हिंजवडी ओळखले जाते. दरराेज 2 लाखांहून अधिक वाहने हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये जा करत असतात. त्यामुळे मेट्राेमुळे या वाहतूकीवर निर्बंध येतील असे बाेलले जात असले तरी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. 

    भावना गायकवाड म्हणाली, मेट्राे सुरु झाल्यास आत्ता ऑफीसला जाण्यासाठी जितका वेळ लागताे ताे वेळ कमी हाेण्यास मदत हाेईल. उरलेल्या वेळे घरच्यांसाेबत किंवा इतर कामांसाठी वापरता येईल. परंतु असे असले तरी सध्या कंपनीकडून कॅब किंवा बससेवा पुरविण्यात येत असल्याने दरराेजच्या प्रवासासाठी मेट्राेचा वापर कितपत केला जाईल असा प्रश्न आहे. कारण घरपाेच कारसेवा असेल तर मेट्राेचा फारसा वापर हाेणार नाही. शुभंकर महाजन म्हणाला, मेट्राे सुरु झाल्यास सुरवातील काही दिवस आयटीयन्सकडून तिचा वापर केला जाईल. परंतु दरराेजच्या वापरासाठी मेट्राेचा फारसा वापर हाेणार नाही. हिंजवडीमध्ये काम करणाऱ्यांच्या शिफ्ट वेगवेगळ्या असतात. त्यात प्रत्येक कंपनीकडून पिकअप अॅण्ड ड्राॅपची सुविधा मिळत असते. ही सुविधा 2 ते 3 हजार महिना इतक्या दरात उपलब्ध हाेत असते. त्यामुळे मेट्राेचे भाडे लक्षात घेता कर्मचारी या सुविधाच जास्त वापर करतील असे वाटते. मेट्राेमुळे फारसा फरक येथील वाहतूकीवर पडणार नाही. 

    अभिषेक पाटील म्हणाला, मेट्राे आल्याने इथल्या वाहतूक काेंडीत फरक पडेल असे मला वाटत नाही. येथे येणारे अनेकजण हे स्वतःच्या खासगी वाहनाने किंवा कंपनीच्या गाडीने येतात. मेट्राे झाली तरी कनेक्टीव्हिटी ची अडचण येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्राे हाेणार असल्याने इतर ठिकाणांहून येणाऱ्या लाेकांचे काय असा प्रश्न निर्माण हाेताे. तसेच मेट्राेच्या भाड्यापेक्षा कंपनीमार्फत पुरविण्यात येणारी सुविधेला कर्मचारी पसंती देतील. 

Web Title: IT employees saying metro is starting is good thing but....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.