‘आधार’ला आयटी विभागाचा ठेंगाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:06 AM2017-11-23T01:06:44+5:302017-11-23T01:06:51+5:30

पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता.

The IT department's Daggach for 'Aadhaar' | ‘आधार’ला आयटी विभागाचा ठेंगाच

‘आधार’ला आयटी विभागाचा ठेंगाच

Next

पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता. मात्र, माहिती तंत्रज्ञान विभागाने (आयटी) जिल्हाधिकाºयांच्या या प्रस्तावाला ठेंगा दाखविला आहे. दोन महिन्यांनंतरही यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे खुद्द जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
आधार नोंदणीचे काम महाआॅनलाईन या संस्थेला दिले आहे. महावितरण आणि खासगी संस्थांच्या कमिशनच्या वादातून आधार नोंदणीचे काम रखडत चालल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या आधार नोंदणी मशीनपैकी १०० मशीन बंद आहेत. या मशीन दुरुस्त करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव देण्यात आलेला होता. यासोबतच महाआॅनलाईनच्या सोबतीने खासगी एजन्सींना शासकीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणी करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये १८५ आधार कार्ड केंद्रे सुरू असल्याचे राव यांनी या वेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी राव यांनी यूआयडीचे सुन्मेष जोशी यांच्यासोबत अन्य कंपन्यांच्या पदाधिकाºयांची आढावा बैठक घेतली. आधारबाबत दररोज आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे.

Web Title: The IT department's Daggach for 'Aadhaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.