सी-डॅक देणार कर्करोगावरील संशोधनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:22 AM2018-02-25T02:22:08+5:302018-02-25T02:22:08+5:30

सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला जाणार आहे.

 Introducing the Research on C-Dake Cancer | सी-डॅक देणार कर्करोगावरील संशोधनाला चालना

सी-डॅक देणार कर्करोगावरील संशोधनाला चालना

Next

पुणे : सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल; तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेशी संवाद साधला आहे, अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.
सी-डॅकच्या परम शावक- आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) या नवीन महासंगणकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. दरबारी यांनी औषधद्रव्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी करण्याबद्दलही त्यांच्या एका पथकाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. ‘‘पी-५३ म्हणजेच ट्युमर प्रथिन हे पेशीचक्राचे नियंत्रण करणाºया प्रथिनाशी संबंधित असे जनूक आहे. म्हणूनच ते ट्युमर सप्रेसर (अर्थात - गाठीचे दमन करणारे) म्हणून काम करते.
औषधद्रव्यांची पुनर्रचना (किंवा त्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी) म्हणजे, आधीपासून माहीत असलेल्या औषधीद्रव्यांचा व संयुगांचा नवीन रोगांवरील उपचारास वापर. या संकल्पनेंतर्गत औषधद्रव्यांच्या पुनर्रचनांचा अभ्यास सी-डॅक, करत असून, मधुमेहावरील औषधद्रव्यांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगावरील संशोधनासाठी केला जाऊ शकतो, असेही डॉ दरबारी यांनी सांगितले.
संरक्षणक्षेत्रात रणांगणाचे प्रत्यंतर देणारी प्रणाली तयार करण्यासाठी; तसेच जाहिरातक्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात, वाहन-अभियांत्रिकीमध्ये, इतकेच काय तर पुरातत्त्वशस्त्रामध्येही या महासंगणकाचा उपयोग करता येणे शक्य आहे. कालवश झालेली द्वारकेसारखी प्राचीन राज्ये आणि हडप्पासारख्या संस्कृतीमधील मूळ रचना डोळ्यांसमोर आणून त्यांची पुनर्निर्मितीही करणे या यंत्रामुळे शक्य होणार आहे. असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.

मधुमेहावरील औषधद्रव्यांचा स्तनांच्या कर्करोगावर उपचार
मानवामधील मधुमेहावरील औषधद्रव्यांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो; अन्यथा तसे औषध मानवी वापरासाठी परिपक्व होण्यासाठी दीर्घकाळापर्यंत वाट बघावी लागते. याखेरीज, आयुर्वेदासारख्या प्राचीन ज्ञानाचाही कर्करोगावरील उपचारप्रणालीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, यावरही अभ्यास सुरू आहे. - डॉ. हेमंत दरबारी, महासंचालक, सी-डॅक

Web Title:  Introducing the Research on C-Dake Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.