..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:35 PM2017-12-14T17:35:26+5:302017-12-14T17:39:09+5:30

'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले.

interview of Tabla vadak Pt. Nana Mule in sawai gandharva bhimsen mahotsav pune | ..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना

..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना

googlenewsNext
ठळक मुद्देस्वत:ला शोधणे महत्त्वाचे असते : पं. नाना मुळे मुळे यांनी भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना केली तबल्याची साथसंगत

पुणे : 'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे. तेव्हा त्यांच्याकडूनही शिकायला मिळते. त्यामुळेच मी कायम जमिनीवर राहिलो. 'हा काय गातो, तो काय वाजवतो,' असे म्हणत बसण्यापेक्षा स्वत:ला शोधणे महत्त्वाचे असते,' असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणा-या कलाकारांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा 'वत्सलाबाई जोशी पुरस्कार' या वर्षी पं. नाना मुळे यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने 'आर्य संगीत प्रसारक मंडळा'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'अंतरंग' या कार्यक्रमात आज श्रीनिवास जोशी यांनी पं. मुळे यांची मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. पं. मुळे यांनी अनेक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत केली आहे.
लहान वयात तबलावादन सुरू केल्यापासून मोठमोठ्या गुरूंकडून तबला शिकण्याची मिळालेली संधी, प्रत्येक गुरूकडे मागितलेला तबलावादनाच्या ज्ञानाचा प्रसाद, संगीत नाटकांसाठी गाणी बसवताना आणि प्रत्यक्ष रंगमंचावर ती गाणी सादर करताना गायक आणि तबलावादक यांच्यात होणा-या गमतीजमती, अशा विविध गोष्टींविषयी पं. नाना मुळे भरभरून बोलले. त्याबरोबरच त्यांच्या अद्वितीय तबलावादनाची झलकही प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाली.
'तबल्यावर कंठसंगीत वाजवणे सर्वांत कठीण असते. गाण्याची लय, बंदिश आणि अर्थ समजून वाजवावे लागते, तसेच रागाच्या स्वभावानुसार ठेका बदलत न्यावा लागतो. तबलावादकाने कुणाचेही गाणे पाडायचे नसते. एखादा गायक तालाला कमजोर असेल तरी त्याला सांभाळून घेत उत्तम साथ करणे ही तबलावादकाची सत्त्वपरीक्षा असते,' असे ते म्हणाले.
'कट्यार काळजात घुसली' या नाटकाच्या ४०० प्रयोगांसाठी, तर 'मत्स्यगंधा' नाटकाच्या ३५० प्रयोगांसाठी आपण तबलावादन केल्याचे पं. मुळे यांनी सांगितले.  'कट्यार' पाहण्यासाठी मदन मोहन, आर. डी. बर्मन असे मोठमोठे संगीतकार येत आणि तबल्यासाठी विशेष दादही देत. मला चित्रपटांमध्ये वाजवण्यासाठी अनेकदा विचारणा झाली. परंतु मैफलींमध्ये वाजवणे हीच माझी आवड असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही,'असेही पं. मुळे यांनी सांगितले.   
याच दिवशी झालेल्या 'षड्ज' या कार्यक्रमात प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट दाखवण्यात आला.

झाला जागा क्रिकेट प्रेमी 
दादरला राहायला असताना सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी रूपक बरोबर अभ्यासाला घरी येत आणि आम्लेट खाऊन घरात अभ्यास करण्याऐवजी डूलक्या घेत. तेव्हा त्यांना फटके देत मी त्यांना उठवून अभ्यासाला बसवायचो. त्याकाळी क्रिकेटर सुनिल गावस्कर फेमस होते आणि माझा आवडता क्रिकेटरही तोच होता, असे सांगून मुळे यांच्यातील क्रिकेटप्रेम जागे झाले.

Web Title: interview of Tabla vadak Pt. Nana Mule in sawai gandharva bhimsen mahotsav pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे