डब्ल्यु एमओकडून भारतीय हवामान विभागाची प्रशंसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 04:04 PM2018-06-06T16:04:47+5:302018-06-06T16:04:47+5:30

भारतीय हवामान विभागातील आरएसएमसी या विभागा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यु एम ओ) प्रशंसा का केली आहे तर मग वाचाच

the Indian weather department appreciation by wmo | डब्ल्यु एमओकडून भारतीय हवामान विभागाची प्रशंसा

डब्ल्यु एमओकडून भारतीय हवामान विभागाची प्रशंसा

Next
ठळक मुद्देसागर, मेकुनू चक्रीवादळाचा दिला अचूक अंदाज भारतीय हवामान विभागाने इन्सॅट ३डी तसेच अन्य अत्याधुनिक साधनाच्या सहाय्याने सातत्याने मागोवा

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या सागर आणि मेकुनू चक्रीवादळाचा अतिजलद मागोवा घेऊन त्यांचा अंदाज अधिक अचूक पध्दतीने भारतीय हवामान विभागाने दिल्यामुळे होणारे नुकसान कमीत कमी झाले़. भारतीय हवामान विभागातील आरएसएमसी या विभागाच्या या कामगिरीचे जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यु एम ओ) प्रशंसा केली आहे़. 
भारतीय हवामान विभागातील रिजनल स्पेशलाईज मेट्रोलॉजिकल सेंटर फॉर टॉपिकल सायक्लोन ओव्हर नॉर्थ इंडियन ओशन (आरएसएमसी) या केंद्रामार्फत दक्षिण भारतीय समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला लक्ष ठेवले जाते़. 
अरबी समुद्रात १६ ते २०मे दरम्यान सागर हे चक्रीवादळ निर्माण झाले होते़. हे चक्रीवादळ १९ मे रोजी सोमालियाच्या किनारपट्टीवर ताशी ७० ते ९५ किमी वेगाने धडकले़. समुद्रातून पश्चिमेच्या दिशेला १९६५ नंतर अशा प्रकारे वळलेले हे पहिलेच चक्रीवादळ होते़. जेव्हा अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला, तेव्हापासून या चक्रीवादळाचा भारतीय हवामान विभागाने इन्सॅट ३डी तसेच अन्य अत्याधुनिक साधनाच्या सहाय्याने सातत्याने मागोवा घेतला़. त्यांची माहिती जगभर प्रसारित केली़.चक्रीवादळ कधी व कोणत्या ठिकाणी धडकणार याची सर्वात प्रथम माहिती ४२ तास आधी भारतीय हवामान विभागाने जाहीर केली होती़. त्याचा संपूर्ण मार्गाविषयीचा अचूक अंदाज जाहीर केला होता़. त्यामुळे सोमालियासारख्या गरीब देशात मागील चक्रीवादळाच्या तुलनेत अतिशय कमी नुकसान झाले़. 
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू या चक्रीवादळाचा पहिला अंदाज हवामान विभागाने १३८ तास अगोदर २० मे रोजी सर्वप्रथम दिला होता़. त्यानंतर त्यांनी दर सहा तासाने त्याची सर्व माहिती व अंदाज जाहीर केले होते़. हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज आणि प्रत्यक्ष चक्रीवादळाचा मार्ग व ते ओमानच्या किनारपट्टीवर धडकण्याची वेळ त्यात अत्यंत कमी अंतर होते़. हवामान विभागाच्या अंदाजामुळे यापूर्वीच्या वादळात येमन येथे झालेल्या नुकसानापेक्षा खूप कमी हानी यावेळी झाली़. 
सागर आणि मेकुनू चक्रीवादळादरम्यान भारतीय हवामान विभागाने अनुक्रमे २७ आणि ४३ बुलेटिन प्रसिद्ध केली़. ही बुलेटिन डब्ल्यु एम ओच्या सदस्यांना वितरीत करण्यात आली़. आरएसएमसीचे प्रमुख डॉ़ एम़ मोहापात्रा यांनी ओमान, येमेन व इतर आंतरराष्ट्रीय विशेषज्ञासमोर मेकुनूविषयी सादरीकरण केले होते़. या सर्व बाबींच्या परिणामामुळे येमेन, ओमान व त्या लगतच्या देशात चक्रीवादळापूर्वीच आवश्यक ती खबरदारी घेतल्याने मनुष्यहानी कमी झाली़. त्यामुळे जागतिक हवामान संघटनेचे भारताच्या या कामगिरीची संघटनेने प्रशंसा केली आहे़.

............................

आरएसएमसी, नवी दिल्ली यांच्या सागर आणि मेकुनू या चक्रीवादळाची आगाऊ सुचना देणाऱ्या बुलेटिन डब्ल्युएमओने युएन आणि त्यांच्या सदस्यांना वितरीत केले़. सर्वांकडून त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे़. त्यामुळे आम्ही आरएसएमसी यांना विनंती करतो की, त्यांनी भविष्यातही चक्रीवादळासंबंधित माहिती सदस्यांना द्यावी़.
तोयाग पेंग, प्रमुख ट्रॉपिकल सायक्लोन प्रोग्राम, वर्ल्ड मेट्रोलॉजीकल आॅगनासेशन

Web Title: the Indian weather department appreciation by wmo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.