स्वातंत्र्यदिनी हिमालयातील माऊंट युनाममध्ये फडकवला जाणार तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:04 PM2018-08-07T20:04:27+5:302018-08-07T20:08:43+5:30

स्वातंत्र्यदिनी पुण्यातील दुर्गप्रमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे अनाेखी माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. यादिवशी हिमालयातील माऊंट युनामवर तिरंगा फडकवण्यात येणार अाहे.

indian flag will be flutter in maun yunam on indipendance day | स्वातंत्र्यदिनी हिमालयातील माऊंट युनाममध्ये फडकवला जाणार तिरंगा

स्वातंत्र्यदिनी हिमालयातील माऊंट युनाममध्ये फडकवला जाणार तिरंगा

Next

पुणे : दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे हिमालयातील माऊंट युनाम(20100फूट) सर करण्याचे ठरविण्यात अाले अाहे. या माेहीमेचे वैशिष्ट म्हणजे ही माेहीम स्वातंत्र्यदिनी फत्ते करण्याचे ठरविण्यात अाले असून या माऊंट युनामवर 14 फूट उंच व 25 फूट लांब तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार अाहे. अशी माहिती दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष सुनील पिसाळ यांनी दिली. 

    ध्वजासाठी लागणारा लाेखंडी खांब व पूर्ण ध्वज हा संस्थेचे गिर्याराेहक स्वतःच्या अंगावर घेऊन जाणार अाहेत. या खांबाचे वजन साधारण साेळा किलाे इतके अाहे. त्याचबराेबर शिवाजी महाराजांचा पुतळाही साेबत घेऊन जाण्यात येणार असून तेथे पुतळ्याचे पूजन करुन शिव घाेषणा देण्यात येणार अाहे.  संस्थेचे सदस्य गाेपाल भंडारी हे यावेळी गीटारवर राष्ट्रगीत सादर करणार अाहेत. या विक्रमाची नाेंद लिम्का बुक अाॅफ रेकाॅर्डमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचे पिसाळ यांनी सांगितले. ही माेहीम 7 अाॅगस्ट ते 20 अाॅगस्ट दरम्यान करण्यात येणार अाहे. या माेहिमेसाठीच्या सर्व सरकारी परवानग्या संस्थेकडून घेण्यात अाल्या अाहेत. 

   दुर्गप्रमी गिरीभ्रमण संस्था ही 1993 साली स्थापन करण्यात अाली. यंदा ही संस्था 25 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने ही विशेष माेहीम हाती घेण्यात अाली अाहे. यापूर्वी संस्थेमार्फत सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक माेहिमा व रिबाेल्टिंग सारखे उपक्रम राबवण्यात अाले अाहेत. त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती संस्थेकडून करण्यात येते. लिंगांना या भव्य किल्ल्यावरील शिवकालीन गुफा शाेधण्याचे कामही या संस्थेमार्फत करण्यात अाले अाहे. 

Web Title: indian flag will be flutter in maun yunam on indipendance day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.