उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:46 PM2018-11-16T12:46:43+5:302018-11-16T12:59:19+5:30

सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण संचालनालयाने मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,त्यात अनेक त्रुटी काढून सुमारे दोन वर्षे मानधन वाढ करण्यास चालढकल केली जात होती.

The increase in the standard of CHB professors by the Higher Education Department | उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ 

उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ 

Next
ठळक मुद्देदुप्पट मानधन : दर महिन्याला जमा होणार रक्कम १६७ अनुदानित महाविद्यालयांमधील सुमारे ४०० प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळणार

पुणे: राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे तब्बल दीड वर्षांनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पुणे विभागातील १६७ अनुदानित महाविद्यालयांमधील सुमारे ४०० प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळणार आहे. नियमानुसार अनुदानित महाविद्यालयांबरोबरच विना अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना सुध्दा संस्थाचालकांनी वाढीव मानधन देणे अपेक्षित आहे. 
राज्याच्या तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणा-या महाविद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली होती.त्याच वेळी उच्च शिक्षण संचालनालयाने मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,त्यात अनेक त्रुटी काढून सुमारे दोन वर्षे मानधन वाढ करण्यास चालढकल केली जात होती.परंतु.एमफुक्टो संघटनेने विविध मागण्यांसाठी कामबंध आंदोलन केल्याने उशिरा का होईना राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागांतर्गत येणा-या सीएचबीच्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.पुणे विभागांतर्गत येणा-या अहमदनगर ,नाशिक व पुणे जिल्ह्यातील १६७ अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना जुना नियमावलीनुसार सहा महिन्यातून एकदा मानधन दिले जात होते. विभागातील ३८९ प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळत होता. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये विभागातील प्राध्यापकांना १ कोटी २४ लाखांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.
 विना अनुदानित महाविद्यालयामधील प्राध्यापकांना संस्थाचालकांकडून सीएचबीचे मानधन दिले जाते. शासनातर्फे देण्यात येणा-या मानधनापेक्षा हे कमीच असते. परंतु, तब्बल दहा वर्षांनी शासनाने सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली आहे. विना अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना सुध्दा वाढीव मानधन मिळाले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून केली जात आहे.
शासनाने सीएचबीच्या प्राध्यापकांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षण विभागाने सर्व रिक्त जागा भरण्यास मान्यता द्यालया हवी.मान्यता मिळाल्यास अनेक प्राध्यापकांना त्याचा लाभ मिळू शकेल,असे एमफुक्टोएचे सचिव प्रा.एस.पी.लवांडे यांनी ह्यलोकमतह्णशी सांगितले.
-----------
पुणे विभागांतर्गत गेल्या वर्षी १६७  अनुदानित महाविद्यालयांमधील ३८९ प्राध्यापकांना सीएचबीचे मानधन देण्यात आले.वर्षभरात सीएचबीच्या मानधनाचे १ कोटी २४ लाख रुपये वितरित करण्यात आले.शासनाने मानधनात वाढ केल्यामुळे ही रक्कम दुप्पट होणार आहे.संस्थाचालकांनी विना अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना सुध्दा नवीन नियमानुसार रक्कम देणे अपेक्षित आहे.
- डॉ.विजय नारखेडे, उच्च शिक्षण सहसंचालक,पुणे विभाग

Web Title: The increase in the standard of CHB professors by the Higher Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.