ठळक मुद्देआॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई; ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूलकारवाई वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली

पुणे : पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्‍यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून ४ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ 
याशिवाय अनियमितपणे प्रवास करणारे ७७ हजार प्रवासी, तसेच सामानाची नोंदणी न करताना घेऊन जाणार्‍या १२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली़ सर्व प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लाख ७२ हजार प्रकरणांत एकूण ९ कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ 
आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे़ आॅक्टोबरमध्ये ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला़ गेल्या वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये ३१ हजार २०१ प्रकरणांत १ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल झाला होता़ 
एप्रिल २०१५ मध्ये पुणे विभागात २९ हजार ४० प्रकरणांत १ कोटी ८० लाख ५८ हजार दंड करण्यात आला होता़ ही कारवाई विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली आहे़ 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.