शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:55 AM2019-02-06T01:55:11+5:302019-02-06T01:55:17+5:30

‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत.

incompatibility in education sector is Dangerous - Dr. Nagnath Kothapalle | शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

शिक्षण क्षेत्रातील विषमता धोकादायक - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

Next

पुणे  - ‘सध्याच्या परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विषमता हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. ही विषमता दूर करायची असेल तर सर्वांनी या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत. पूर्वी असे नव्हते, सन १९७०-७५ च्या काळात एखाद्या प्रश्नावर लोकांमधून आवाज उठवला जायचा, उठाव व्हायचे, असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित ‘यशोगाथा विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, शाळेची’ या पुस्तकाचे प्रकाशन कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद जावडेकर होते.
माजी विद्यार्थी दलाचे अध्यक्ष अविनाश खंडारे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते मधुकर निरफराके, प्राचार्या वृंदा हजारे, मुख्याध्यापिका मंगला कांबळे, शालेय समितीच्या अध्यक्षा वर्षा गुप्ते, सचिव आॅड. दिलावर खान, काचेश्वर बारसे, दामिनी पवार, रजनी धनकवडे, ज्योती भिलारे, विनोद वाघ, माजी विद्यार्थी दलाचे अविनाश रायरीकर, समीर पवार, प्रशांत राजगुरू, अविनाश भालशंकर उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने अनेक माजी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दीपक गायकवाड यांनी आभार मानले.

राष्ट्र सेवा दलाचे रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि सानेगुरुजी प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील माजी विद्यार्थी दलाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

Web Title: incompatibility in education sector is Dangerous - Dr. Nagnath Kothapalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे