मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी ‘इन्सिनरेटर’; पुण्यातील नायडू हॉस्पिटल परिसरात प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:29 PM2018-01-17T13:29:06+5:302018-01-17T13:33:23+5:30

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्र्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

'Incineration' for the disposal of dead animals; Project in Naidu Hospital in Pune | मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी ‘इन्सिनरेटर’; पुण्यातील नायडू हॉस्पिटल परिसरात प्रकल्प

मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी ‘इन्सिनरेटर’; पुण्यातील नायडू हॉस्पिटल परिसरात प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देनायडू हॉस्पिटल परिसरातील डॉग पॉड शेजारील जागेत उभारणार प्रकल्पपुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत उपक्रम

पुणे : शहरात विविध भागात मृत पडणाऱ्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न सध्या शहरामध्ये आहे. यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आता महापालिकेच्या वतीने नायडू हॉस्पिटल परिसरातील डॉग पॉड शेजारील जागेत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 
याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की सध्या शहरात मृत प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अनेक अडचणी येतात. 

Web Title: 'Incineration' for the disposal of dead animals; Project in Naidu Hospital in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे