चाकणमध्ये कांद्याची आवक कमी; भावात ३२५ रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:58 AM2019-03-11T02:58:49+5:302019-03-11T02:58:57+5:30

भुईमूग शेंगाची आवक, बटाट्याची आवकही कमी, पालेभाज्यांच्या भावात किरकोळ घसरण

Inadequate onion in Chakan; Rupee rises by Rs 325 | चाकणमध्ये कांद्याची आवक कमी; भावात ३२५ रुपयांनी वाढ

चाकणमध्ये कांद्याची आवक कमी; भावात ३२५ रुपयांनी वाढ

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ९१०५ क्विंटलने घटली. भावात ३२५ रुपयाने वाढ झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २२५०० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १२२० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २०० क्विंटलने घटली, बटाट्याचा कमाल भाव १३०० रुपये झाला . या सप्तहात भुईमूग शेंगाची आवक ६ क्विंटल झाली, भाव ५८०० रुपये झाले. लसणाची एकूण आवक ९ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव या सप्तहातही २६०० रुपयांवर आला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४६७ पोती झाली.

राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ९०,००० जुड्यांची आवक होऊन ५१ ते ४५० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर १४,००० जुड्यांची आवक होऊन ५१ ते ४५० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.

शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे : कांदा- एकूण आवक - २२,५०० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक २: ७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ४५० रुपये. बटाटा - एकूण आवक - १२२० क्विंटल. भाव क्रमांक १ : १३०० रुपये, भाव क्रमांक २ : ११०० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये.
भुईमूग शेंग - एकूण आवक - ६ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५८०० रुपये, भाव क्रमांक २ : ४९०० रुपये, भाव क्रमांक ३ : ४५०० रुपये. लसूण ९ आवक, भाव क्रमांक १, २६००, क्र. २४००, क्र. १७०० रुपये.

फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : टोमॅटो - ९१५ पेट्या (७०० ते १८०० रु.), कोबी - २०५ पोती (९०० ते १४००), फ्लॉवर - २९५ पोती (७०० ते १४००), वांगी - २६०- पोती (२५०० ते ३५००), भेंडी - ५१० पोती (२५०० ते ३५००), दोडका - १६० पोती (३५०० ते ४५००), कारली - २८५ डाग (३००० ते ४०००), दुधीभोपळा- १४० पोती (१५०० ते २५००) , काकडी - २७० पोती (१५०० ते २५००),
फरशी - ३० पोती (४५०० ते ५५००), वालवड - ३४० पोती (३५०० ते ५५००), गवार - ८० पोती (५००० ते ७०००), ढोबळी मिरची - ४२० डाग ( २५०० ते ३५००), चवळी - ६० पोती (२५०० ते ३५००) , शेवगा- ९५ डाग (३५०० ते ४५००), वाटाणा - ६४० (१५०० ते २५००), गाजर-१७० (१२०० ते १६००).
पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण १३४९० जुड्या (५०० ते १००० रुपये), कोथिंबीर - एकूण १८४६० जुड्या (३०० ते ८०० रुपये),
शेपू - एकुण ६८५० जुड्या (४०० ते ८०० रुपये), पालक - एकूण ६२६५ जुड्या (२०० ते ६००).

बटाटा भाव १३०० रुपयांवर स्थिर
चाकण येथील बाजारात कांद्याची आवक या सप्ताहात ९१०५ क्विंटलने घसरली, तर भाव मात्र ३२५ रुपयाने वधारले, या सप्ताहात बटाटा आवक २०० क्विंटल ने घटून भाव १३०० रुपयावर स्थिर झाले. या सप्ताहात कोबी, टोमॅटो, दुधी भोपळा, वांगी, कारली, वाटाणा, शेवगा, ढोबळी मिरची, गवार, गाजर, फरस बी, वालवर या भाज्यांची आवक कमी झाली व भाव किरकोळ कमी-जास्त वाढले.
या सप्तहात भुईमूग शेंग आवक वाढली व भाव कमी झाले, तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसूण आवकमध्ये वाढ होऊन भाव उतरले. या सप्ताहात भाज्यांची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात उलाढाल कमी झाली , बाजारात एकूण उलाढाल ३ कोटी ९५ लाख रुपये झाली.
 

Web Title: Inadequate onion in Chakan; Rupee rises by Rs 325

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा