पुणेकरांसाठी महत्वाचे : नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:10 PM2019-02-07T15:10:00+5:302019-02-07T15:12:28+5:30

पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद राहणार असल्याचे महामेट्रोने कळवले आहे. 

Important for Puneites: Mutha river road become close for three days from tomorrow | पुणेकरांसाठी महत्वाचे : नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस बंद 

पुणेकरांसाठी महत्वाचे : नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस बंद 

Next

पुणे : पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद राहणार असल्याचे महामेट्रोने कळवले आहे. 

                कोथरूड, कर्वेनगर, वारजे आणि इतर भागातील उपनगरांना पेठ भागाशी जोडणारा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता शुक्रवार (दि.८) रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा रस्ता बंद असणार असल्याचे महामेट्रोतर्फे कळवण्यात आले आहे. अर्थात टिळक चौक, बालगंधर्व आणि इतर भागातूनही पेठ भागात जाणे शक्य असल्याने पुणेकरांना तेवढी अडचण होईल असे नाही. मात्र शनिवार-रवीवारमधील सुट्टीच्या दिवसात नदीपात्रातील वापर करता येणार नाही. 

              सध्या संपूर्ण शहरात मेट्रोचे काम जोरदार सुरु आहे, नदीपात्रातही मेट्रोचे मोठमोठाल्या स्ट्रक्चर्सची उभारणी डोळ्यात भरते. मात्र लहान रस्ता आणि मोठ्या प्रमाणावर दुचाकींची ये-जा त्यामुळे खांब बसवण्यास अडचणी आहेत. या कारणास्तव रस्ता बंद करून खांब बसवण्यात येणार आहेत. खांबांची उभारणी दिवसरात्र काम करून करण्यात येणार आहेत. या संदर्भात महामेट्रोतर्फे नदीपात्र आणि पर्सिस्टंट कंपनीजवळ फलक लावण्यात आला आहे. हे काम लवकरात लवकर शीघ्र गतीने पूर्ण करून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे महामेट्रो प्रशासनाने कळवले आहे. 

Web Title: Important for Puneites: Mutha river road become close for three days from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.