चित्रपटसृष्टीत प्रामाणिकतेला महत्त्व : गिरीश ओक; महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा पुण्यात वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:07 PM2018-01-10T12:07:42+5:302018-01-10T12:49:59+5:30

मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते,’’ असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.

Importance of honesty in the film industry: Girish Oak; Anniversary of Maharashtra Brahman meeting in Pune | चित्रपटसृष्टीत प्रामाणिकतेला महत्त्व : गिरीश ओक; महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा पुण्यात वर्धापन दिन

चित्रपटसृष्टीत प्रामाणिकतेला महत्त्व : गिरीश ओक; महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा पुण्यात वर्धापन दिन

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या ९२व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याई सभागृह येथे कार्यक्रमब्राह्मण ब्राह्मणांचे पाय का खेचतात? : डॉ. गिरीश ओक

पुणे : ‘‘मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात ब्राह्मण, जातपात, धर्म हे काहीच बघितले जात नाही. तिथे फक्त तुमचा दिलेला शब्द, दिलेली वेळ, तुमचे कष्ट, तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते,’’ असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.
महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या ९२व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याई सभागृह, कोथरूड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतकार प्रभाकर जोग अध्यक्षस्थानी होते. या वेळी सुरेश धर्मावत, गिरीश काळे, प्रकाश दाते, अतुल व्यास  डॉ. दिलीप पटवर्धन, संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भालचंद्र कुलकर्णी, शिरीष काळे, नानासाहेब (रघुराज) तुळशीबागवाले, भगवंतराव कुलकर्णी, विश्वास पटवर्धन, अभिजित अग्निहोत्री, संस्थेच्या अध्यक्षा, सुनीती दाते आदी उपस्थित होते.  
संस्थेविषयी सांगायचे म्हणजे ९२ वर्षे जुनी ब्राह्मण सभा ही संस्था आहे. एवढ्या वर्षांपासून जर ही संस्था समाजकार्य करते आहे, तर मग माणूस किती जुना आहे आणि तो केव्हापासून तयार झाला आणि तेव्हापासून तो काय-काय करीत आला आहे, याचाही आपण विचार करायला हवा, असेही ओक म्हणाले.  
केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश दाते यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा कुलकर्णी यांनी ईशस्तवन सादर केले. अतुल व्यास यांनी आभार मानले.

डॉ. ओक म्हणाले, ‘‘ब्राह्मण, ब्राह्मण समाज, जात या गोष्टींपासून आमच्या वडिलांनी आम्हाला नेहमी लांब ठेवले. व्हॉट्स अ‍ॅपवर एकदा आले, की पटेल लोक एकमेकांना कसे मदत करतात; तर मग ब्राह्मण ब्राह्मणांचे पाय का खेचतात?’ असा प्रश्न मला पडायचा. पण, आता परिस्थिती बदलली आहे. 
आज बिझनेसच्या संदर्भात बरेच ग्रुप तयार झालेले आहे. त्यामध्ये तरुण ब्राह्मण पिढीचा जास्त समावेश दिसून येतो. ही चांगली गोष्ट आहे.’’ 

पुरस्कार प्रदान 
कार्यक्रमात अशोक देशमाने  (स्नेहवन) यांना सामाजिक पुरस्कार  देण्यात आला. सानिका नादगौडा (रोप मल्लखांब) यांना खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, उद्योजक पुरस्कार निरुता किल्लेदार (असीम फाउंडेशन) यांना देण्यात आला.

Web Title: Importance of honesty in the film industry: Girish Oak; Anniversary of Maharashtra Brahman meeting in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.