यंदापासूनच होणार 10 टक्के आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी : प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 01:24 PM2019-01-20T13:24:20+5:302019-01-20T13:29:25+5:30

सवर्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Implementation of 10% Financial Reservation from 2019 year only : Prakash Javadekar | यंदापासूनच होणार 10 टक्के आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी : प्रकाश जावडेकर

यंदापासूनच होणार 10 टक्के आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी : प्रकाश जावडेकर

Next
ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी यंदापासून - जावडेकर केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश काढला - प्रकाश जावडेकर

पुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी)  असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, या संदर्भात केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश काढला आहे. सर्व राज्य सरकार त्याचे पालन करतील असा मला विश्वास आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षांकडे सक्षम चेहरा नाही. "मजबूर नव्हे मजबूत सरकार " हा निवडणुकीचा असणार मुख्य मुद्दा असणार आहे. 'हमारा घर भाजपा का घर' असा पक्षाचा मुख्य अजेंडा असणार आहे. यात जे मतदार भाजपाला मतदान करणार आहेत. ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून पाठींबा देतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पुण्याच्या स्थानिक मुद्यांवरही मत मांडले. पाणीकपातीविषयी त्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवत अधिक भाष्य करण्याचे टाळले. शहरात सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत त्यांनी सकारात्मक मत व्यक्त करताना दिल्लीचे उदाहरण दिले.ते म्हणाले की, दिल्लीत हेल्मेटसक्ती असून त्याचे सर्वच राजकीय पक्षाचे नेते हेल्मेट घालतात. त्यामुळे पुण्यातील हेल्मेटसक्तीला विरोध करण्याचे कारण नाही.

Web Title: Implementation of 10% Financial Reservation from 2019 year only : Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.