मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:25 AM2018-05-23T00:25:38+5:302018-05-23T00:25:38+5:30

जनजागृती करणार; पुणे-मुंबईमध्येही अत्यल्प प्रमाण

Ignore the lease agreement by stamp duty | मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराकडे दुर्लक्ष

मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराकडे दुर्लक्ष

Next

पुणे : सदनिका मालक व भाडेकरी यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मुद्रांक शुल्क भरून केलेल्या भाडे कराराला कायदेशीर महत्त्व आहे. मात्र, राज्यातील केवळ पुणे, मुंबई, ठाणे, रायगड या प्रमुख शहरांमध्येही अगदी अल्प प्रमाणात मुद्रांक शुल्काद्वारे भाडे कराराची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाकडून नागरिकांमध्ये याबाबत जागृती केली जाणार आहे.
राज्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये नोकरी, शिक्षण व व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक व विद्यार्थी भाडे तत्त्वावर सदनिका घेतात. त्यातही भाडेकरूंना या सदनिका दलालांमार्फत (मध्यस्थ) घ्यावा लागतात. त्यात सदनिका मालक, भाडेकरू यांना आर्थिक फटका बसतो. साधारणपणे सदनिका मालक व भाडेकरू काही अटी व शर्ती यासाठी पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु, त्याला कायदेशीर आधार नाही.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकरारासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाडे कराराची रक्कम आणि अनामत रक्कमेच्या आधारे मुद्रांक शुल्काची रक्कम आकारली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्काद्वारे भाडे करार करणे आवश्यक आहे. भाडेकरारासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरूला सदनिकेवर दावा सांगता येत नाही. परंतु केवळ मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, रायगड आणि पुणे शहर व पुणे ग्रामीण या भागातच मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकरार केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

मुद्रांक शुल्काद्वारे भाडेकराराची विभागनिहाय आकडेवारी
मुंबई - २१ हजार ३८४
ठाणे - १९ हजार ७६७
पुणे - १९ हजार ५९२
नागपूर - ३०४
नाशिक - ६९७
औरंगाबाद - २३०
अमरावती- १३६
लातूर - २१८

Web Title: Ignore the lease agreement by stamp duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर