सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थीनींना अायएएस शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:15 PM2018-05-22T19:15:13+5:302018-05-22T19:15:13+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अायबीबी विभागातील दाेन विद्यार्थीनींना प्रतिष्ठेची अायएएस शिष्यवृत्ती मिळाली अाहे.

IAS scholarship to two students of pune university | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थीनींना अायएएस शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थीनींना अायएएस शिष्यवृत्ती

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायाेइन्फाॅरमॅटिक्स व बायाेटेक्नाॅलाॅजी विभागामधील ( अायबीबी) नताशा केळकर अाणि मैत्रेयी पूर्णपात्रे या विद्यार्थ्यीनींना या वर्षीची प्रतिष्ठेची अायएएस शिष्यवृत्ती मिळाली अाहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देशातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांबराेबर दाेन महिन्यांच्या काळासाठी काम करण्याची संधी मिळत असते. 
   या शिष्यवृत्ती अंतर्गत नताशा हैद्राबादमधील एल. व्ही. प्रसाद अाय इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिक डाॅ. इंद्रजीत काैर यांच्याबराेबर काम करणार अाहे. नताशा मायअाेपिया अाणि ग्ल्युकाेमासंदर्भात काैर यांच्यासमवेत काम करणार अाहे. या संधीमुळे उत्साह वाढला असून मी लवकरात लवकर लॅबमध्ये सामील हाेण्यास उत्सुक अाहे, अशी भावना ही शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर नताशाने व्यक्त केली. 
   मैत्रीयी बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ सायन्स येथील प्रख्यात वैज्ञानिक डाॅ. संदीप ईश्वरप्पा यांच्याबराेबर काम करणार अाहे. या शिष्यवृत्तीसाठी देशभरातील प्राप्त झालेल्या अर्जांनंतर अकादमीकडून निवडक प्रतिभावान उमेदवारांची निवड केली जाते. या पार्श्वभूमीवर नताशा व मैत्रेयीची झालेली निवड ही विद्यापीठासाठी व विशेषतः अायबीबीसाठी अभिमानाची बाब अाहे असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात अाले.

Web Title: IAS scholarship to two students of pune university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.