पोलिसांनी सांगितले तर बोलेन : डी. एस. कुलकर्णी; पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:53 PM2018-02-07T13:53:17+5:302018-02-07T13:55:17+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी निलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले.

I will talk When the police said : D. S. Kulkarni; Inquiries in Pune Police Commissioner's Office | पोलिसांनी सांगितले तर बोलेन : डी. एस. कुलकर्णी; पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

पोलिसांनी सांगितले तर बोलेन : डी. एस. कुलकर्णी; पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशी सुरू झाली आहे, पोलिसांनी काहीही सांगण्यास मनाई केली आहे : डी. एस. कुलकर्णीकाय चौकशी केली, हा तपासाचा भाग असल्याने आता सांगता येणार नाही : नीलेश मोरे

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी नीलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले. दुपारी १ वाजेपर्यत त्यांची पोलीस उपायक्त सुधीर हिरेमठ व मोरे यांनी चौकशी केली. 
बाहेर पडताना डी. एस. कुलकर्णी म्हणाले, की चौकशी सुरू झाली आहे, पोलिसांनी काहीही सांगण्यास मनाई केली आहे. त्यांनी परवानगी दिली तर, मीडियाशी बोलेन. 
नीलेश मोरे म्हणाले, की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाचा भाग म्हणून चौकशी सुरू झाली आहे, काय चौकशी केली, हा तपासाचा भाग असल्याने आता सांगता येणार नाही. 
दरम्यान, डीएसकेंच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रकिया महसूल विभागाकडून केली जात आहे.

Web Title: I will talk When the police said : D. S. Kulkarni; Inquiries in Pune Police Commissioner's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.