‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:17 PM2019-05-20T16:17:12+5:302019-05-20T16:23:51+5:30

‘मी शनिवारवाडा बोलतोय' हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो गेल्या महिन्याभरापासून बंद आहे.

'I am talking Shaniwarwada',sound is 'Mute' | ‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’

‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’

googlenewsNext
ठळक मुद्देविद्युत दाब कमी- जास्त झाल्याने झालेल्या बिघाडामुळे सॉफ्टवेअर करप्ट ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीसह पालकांची निराशा

पुणे : ‘मी शनिवारवाडा बोलतोय' हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो मागील महिन्याभरापासून बंद पडला असून विद्युत दाब कमी- जास्त झाल्याने झालेल्या बिघाडामुळे सॉफ्टवेअर करप्ट झाला आहे. हे सॉफ्टवेअर दुरुस्त करून पुन्हा नव्याने देण्यासाठी पालिकेला तीन लाख रुपये मोजावे लागले आहेत. नुकतेच विद्युत विभागाने हे पैसे संबंधीत सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहेत. 
हा शो गेल्या महिन्याभरापासून बंद पडला असून ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीसह पालकांची निराशा होत आहे. याशिवाय, महापालिकेच्या उत्पन्नालाही फटका बसतो आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला शनिवारवाडा पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पुण्याचा आणि शनिवारवाड्याचा इतिहास नागरिकांसह पर्यटकांना समजावा, तीन वर्षांपूवीर्पालिकेने ४ ते ५ कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी नवी साऊंड सिस्टीम आणि विद्युत यंत्रणा बसविली. तब्बल २२ कलाकारांच्या आवाजाचा समावेश ह्यलाईट अ‍ॅन्ड साऊंड' शोमध्ये करण्यात आला. 
येथील बैठक व्यवस्था आणि अन्य बाबींची दुरवस्था झाली आहे. त्यातच पालिकेच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे हा शो पुन्हा बंद पडला आहे. विद्युत दाब कमी-जास्त झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. स्पीकर, मिक्सर आणि अन्य उपकरणांमध्ये हा बिघाड झाल्यामुळे हा शो महिन्याभरापासून बंद असल्याचे पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. हा बिघाड दूर करून शो पुन्हा पूर्ववत व्हायला आणखी १५ दिवस लागतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने पुन्हा नव्याने ते तयार करून घ्यावे लागणार असून त्यासाठी विद्युत विभागाने तीन लाळ रुपए संबंधीत विभागाला दिले आहेत. या दुरीस्तीसाठी आणखी खर्च येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 'I am talking Shaniwarwada',sound is 'Mute'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.