उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:51 AM2018-08-15T01:51:06+5:302018-08-15T01:51:26+5:30

उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

Honor for the remarkable service: President's Medal to the Police Officers | उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

उल्लेखनीय सेवेसाठी सन्मान : पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

Next

पुणे  - उल्लेखनीय कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांत उल्लेखनीय सेवेबद्दल पुणे पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांचा समावेश आहे़ गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड, मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते, विठ्ठल कुबडे (पिंपरी), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे (गुन्हे शाखा), किशोर अत्रे (बिनतारी संदेश विभाग), सहायक फौजदार चंद्रकांत इंगळे (गुन्हे शाखा) तसेच दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे समादेशक श्रीकांत पाठक यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे़
कारागृह विभागातील सुभेदार कलप्पा कुंभार (येरवडा कारागृह), हवालदार कैलास बाऊस्कर
(मुंबई जिल्हा महिला कारागृह), शिपाई संजय तलवारे, राजू हाते (नागपूर कारागृह) यांना राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर करण्यात आले आहे़
नागपूरहून पुणे पोलीस आयुक्तालयात सहआयुक्तपदी नुकतेच रुजू झालेले शिवाजी तुळशीराम बोडखे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे़ बोडखे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुद्रीक या गावचे असून १९८४मध्ये पोलीस उपअधीक्षकपदावर नियुक्त झाले़ चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना सेवाकालावधीत उत्कृष्ट सेवेबद्दल ६१६ बक्षिसे मिळालेली असून त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व मिळाले आहे़
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे पोलीस अधीक्षक व नियंत्रक सारंग दादाराम आवाड यांनी १९९६मध्ये सेवेची सुरुवात केली. पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षक असताना विक्रमी ३७३ गुन्ह्यांमध्ये सापळा रचून कारवाई केली. पुण्यात वाहतूक पोलीस उपायुक्तपदी असताना मोटार वाहन कायद्याअंतर्गत विक्रमी कारवाई केली. राज्य राखीव पोलीस बलात क्र. २ येथे कमांडंट असताना त्यांनी गट २ ला प्रथम आयएसओ मानांकन मिळवून दिले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे हे १९९३मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले़ त्यांना आतापर्यंत ८६९ रिवॉर्ड आणि विशेष सेवापदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, आंतरिक सुरक्षा पदक प्राप्त झाली आहेत.
मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते १९९३मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले़ त्यांना आतापर्यंत ३५८ बक्षिसे मिळालेली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रकही मिळाले आहे़
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे हे पोलीस शिपाई म्हणून १९८३मध्ये पोलीस सेवेत भरती झाले़ त्यांना २०० बक्षिसे मिळाली आहेत़
गुन्हे शाखेचे सहायक फौजदार चंद्रकांत इंगळे यांना आतापर्यंत ३५६ बक्षिसे मिळालेली असून पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक मिळाले आहे़
दौैंड येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे समादेशक
श्रीकांत पाठक यांना राष्ट्रपती
पोलीस पदक जाहीर झाले आहे. पाठक हे २२ वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सायकलिंग व्यायामाचे महत्त्व ते पटवून देत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी दौंड ते पंढरपूर हा १४८ किलोमीटरचा सायकल प्रवास सात तासांत पार केला होता़

Web Title: Honor for the remarkable service: President's Medal to the Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.