प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:44 PM2018-02-22T12:44:47+5:302018-02-22T12:49:30+5:30

घोर तपस्वी प. पू. प्रफुल्लाजी म. सा. प. पू. दीक्षताजी म. सा., प. पू. डॉ. उदिताश्रीजी म. सा., प. पू. विशुद्धीजी म. सा. आदी ठाणा यांचा होळी चातुर्मास वडगावशेरी जैन स्थानकांत होणार आहे.

holi chaturmas of Prafullaji m. s. in VadgaonSheri Jain Sthanak, Pune | प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास

प्रफुल्लाजी म. सा. यांचा वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मास

Next
ठळक मुद्देवडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनमधुर वक्ता प. पू. रमणिककंवरजी म. सा. आदी ठाणा पाच यांचा चातुर्मास

बिबवेवाडी : घोर तपस्वी प. पू. प्रफुल्लाजी म. सा. प. पू. दीक्षताजी म. सा., प. पू. डॉ. उदिताश्रीजी म. सा., प. पू. विशुद्धीजी म. सा. आदी ठाणा यांचा होळी चातुर्मास वडगावशेरी जैन स्थानकात होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विजय छाजेड यांनी दिली. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षी वडगावशेरी जैन स्थानकात होळी चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संघाच्या वतीने करण्यात येणार आहेत. १ मार्चला होणाऱ्या होळी चातुर्माससाठी संघाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असून यावर्षी मधुर वक्ता प. पू. रमणिककंवरजी म. सा. आदी ठाणा पाच यांचा चातुर्मास वडगावशेरी जैन स्थानकात होणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक भाविक येणार असून शहरातील भाविकांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विजय छाजेड यांनी केले.

Web Title: holi chaturmas of Prafullaji m. s. in VadgaonSheri Jain Sthanak, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.