निराधार माता मदतीसाठी करतेय जॉन अब्राहमचा धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:13 AM2017-08-19T05:13:18+5:302017-08-19T05:13:30+5:30

उदरनिर्वाहासाठी मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाकडे बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने पाठ फिरविल्याचा आरोप एका निराधार ज्येष्ठ नागरिक महिलेने केला आहे.

The helpless mother helps John Abraham | निराधार माता मदतीसाठी करतेय जॉन अब्राहमचा धावा

निराधार माता मदतीसाठी करतेय जॉन अब्राहमचा धावा

Next

पुणे : मुलाच्या अपघाताला कारणीभूत ठरल्यानंतर उपचारासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाकडे बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने पाठ फिरविल्याचा आरोप एका निराधार ज्येष्ठ नागरिक महिलेने केला आहे. मदत करतो असे सांगत केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शारदा दत्तू कसबे (वय ७०, रा. शांताईनगर, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे त्यांचे नाव आहे. त्या पती व दोन मुलांसह मुंबईतील सांताक्रुझ झोपडपट्टीमध्ये राहण्यास होत्या. मुलगा शाम वाईन शॉपमध्ये कामाला होता. शाम आणि त्याचा मित्र तन्मय सायकलवरुन घराकडे येत असताना जॉन अब्राहम चालवित असलेल्या दुचाकीची त्यांना धडक बसली. या अपघातात शाम, तन्मय आणि स्वत: जॉन जखमी झाला होता. शाम आणि तन्मयवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. शामचा मार्च २००९ मध्ये मृत्यू झाला. काही दिवसांनी त्या पुण्यामध्ये राहण्यास आल्या. शाम मयत असल्याने शारदा यांना उच्च न्यायालयामध्ये सुनावनीसाठी बोलावण्यात आले. जॉनने मोटार केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षºया घेतल्या. स्वत:चे छायाचित्र देऊन त्याच्या पाठीमागे मोबाईल क्रमांक देऊन मदत लागल्यास फोन करा, असे सांगितले. पुण्याला घरी सोडले. त्यानंतर फोन केला, तेव्हा समोरच्याने फोन बंद केला. हा क्रमांक आजवर बंदच आहे, असे शारदा यांनी सांगितले.
>पुण्यात शारदा यांनी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला. सध्या वार्धक्यामुळे त्यांना काम होत नाही. त्यांच्यासमोर जगायचे कसे? असा मोठा प्रश्न आहे.

Web Title: The helpless mother helps John Abraham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.