खड्डे बुजवा, गरजूंना मदत करा; गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:18 AM2017-08-22T05:18:26+5:302017-08-22T05:18:43+5:30

रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी दाखवत पुढाकार घ्यावा. तसेच मंडळांनी जमा होणा-या वर्गणीतील दहा टक्के रक्कम रुग्ण व गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले.

Help the potholes, the needy; Charitable Commissioner's Appeal to Ganesh Mandals | खड्डे बुजवा, गरजूंना मदत करा; गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

खड्डे बुजवा, गरजूंना मदत करा; गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

Next

पुणे : रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी दाखवत पुढाकार घ्यावा. तसेच मंडळांनी जमा होणा-या वर्गणीतील दहा टक्के रक्कम रुग्ण व गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले.
डिगे यांनी सोमवारी शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. या वेळी सहधर्मादाा आयुक्त शिवाजीराव कचरे, सहायक आयुक्त नवनाथ जगताप, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते, कमल ढोलेपाटील, राजेंद्र कोंढरे, राहुल ढोलेपाटील, सचिन धनकुडे यांच्यासह इतर मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डिगे म्हणाले, की पावसाळ््यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन आपल्या परिसरातील रहिवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे गणेश मंडळांनी आपल्या परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून वर्गणीतून जमा झालेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम गरजू विद्यार्थी, रुग्णांच्या खर्चासाठी द्यावी. मंडळांनी ठिकठिकाणी वृक्षारोपणही करायला हवे.
डिगे यांच्या आवाहनला प्रतिसाद देत सेवा मित्रमंडळातर्फे पूना नाईट हायस्कूलमधील ११ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया मदतीचा धनादेशही हायस्कूलचे प्राचार्य अविनाश ताकवले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी मंडळाकडून केल्या जाणाºया विविध कामांची माहिती दिली. काही मंडळांनी खर्च वजा करून राहिलेल्या वर्गणीतील १० टक्के रक्कम राखून ठेवण्याची तयारी दर्शविली.

... तर फौजदारी कारवाई
गणेश मंडळांनी विविध कामे, तसेच मदतीचा लेखापरीक्षण अहवालात नमूद करावा. तसेच वर्गणी जमा करण्यासाठी आवश्यक परवानगी घेणेही आवश्यक आहे. या वर्गणीचा हिशोब योग्य पद्धतीने सादर न करता गैरकारभार करीत असलेल्या मंडळांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा धर्मादाय आयुक्त डिगे यांनी या वेळी दिला.

धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या सूचना निश्चितपणे स्वागतार्ह आहेत. लोकसहभागातून नेहमीच चांगल्या गोष्टी घडतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे, गरजूंना मदत, वृक्षारोपण या उपक्रमांमध्ये सर्व मंडळे सहभागी होतील. त्यांना एकत्र प्रयत्न केला जाईल.
- श्रीकांत शेटे,
कसबा गणपती मंडळ

Web Title: Help the potholes, the needy; Charitable Commissioner's Appeal to Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.