पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळची चव तुम्ही चाखलीत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 09:27 PM2018-06-24T21:27:29+5:302018-06-24T21:29:12+5:30

पुण्याची मिसळ ही संपूर्ण जगात प्रसिद्ध अाहे. पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळने अाता पुणेकरांच्या मनात घर केले असून या मिसळची चव चाखण्यासाठी खवय्ये अाता गर्दी करीत अाहेत.

Have you tasted dum missal from pune ? | पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळची चव तुम्ही चाखलीत का ?

पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळची चव तुम्ही चाखलीत का ?

googlenewsNext

पुणे : पुण्यात अाला अाणि मिसळ खाल्ली नाही असा काेणी सापडणे अवघड अाहे. प्रत्येक शहारातील पदार्थ हा त्या शहराची खासियत असते, तशीच मिसळ ही पुण्याची अाणि पुणेकरांची खासियत अाहे. पुण्यात विविध प्रकारच्या मिसळ खाण्यास मिळतात. त्यातच अाता दम मिसळ या अागळ्या-वेगळ्या मिसळची भर पडली अाहे. मातीच्या मटक्यात दिली जाणारी स्माेकी फ्लेवर असलेली ही मिसळ अाता पुणेकरांच्या पसंतीस उतरत अाहे. 


    पुण्यातील काेथरुड भागात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या शेजारील महालक्ष्मी हाॅटेलमध्ये ही दम मिसळ मिळते. त्याचबराेबर पुण्यातील इतर भागातही या दम मिसळची चव तुम्हाला चाखायला मिळेल. नेहमीच्या मिसळपेक्षा वेगळी एका मातीच्या मटक्यामध्ये तुम्हाला मिसळ दिली जाताे. साेबत पावजाेडी बराेबरच जिलेबी, दही या मिसळीच्या चवीत भर घालते. मातीच्या भांड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या मिसळमध्ये एका छाेट्या भांड्यात काेळसा ठेवला जाताे अाणि वरुन झाकन बंद केले जाते. खवय्यांना ही मिसळ दिल्यानंतर झाकण उघडून काेळसा बाहेर काढला जाताे. या काेळश्यामुळे या मिसळला एक स्माेकी फ्लेवर मिळताे. या मिसळ साेबतच झणझणीत असे सॅम्पल दिले जाते. ग्राहकांना हवे तसे ते या मिसळमध्ये टाकू शकतात. मातीच्या मडक्यामुळे व स्माेकी फ्लेवरमुळे या मिसळची चव अफलातून लागते. 


    महालक्ष्मी हाॅटलचे संचालक अनिकेत पानसे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी अाम्ही ही मिसळ सुरु केली. सुरुवातीपासूनच पुणेकरांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे. मला अाणि माझा सहकारी केदार नातू याला मिसळची अावड असल्याने अाम्ही विविध ठिकाणच्या मिसळ ट्राय केल्या. सुरुवातीला अाम्ही मिसळ थाळी सुरु केली त्यानंतर दम मिसळ ही पुणेकरांमध्ये प्रसिद्ध असलेली मिसळ सुरु केली. या मिसळला एक स्माेटी टेस्ट येत असल्याने खवय्ये अावडीने ही मिसळ खातात. 

Web Title: Have you tasted dum missal from pune ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.