लोकप्रतिनिधींनी तालुक्याला मागे नेले - हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:59 AM2018-05-28T02:59:22+5:302018-05-28T02:59:22+5:30

आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

Harshavardhan Patil News | लोकप्रतिनिधींनी तालुक्याला मागे नेले - हर्षवर्धन पाटील

लोकप्रतिनिधींनी तालुक्याला मागे नेले - हर्षवर्धन पाटील

Next

निमसाखर - आमच्या हक्काचे पाणी दुसऱ्या तालुक्याकडून वापरले जाते. मात्र निष्क्रिय प्रतिनिधीमध्ये जाब विचारण्याचे धाडसही होत नाही. तालुक्याला मागे नेण्याचे काम सध्याच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे, अशी खरमरीत टीका आमदार भरणे यांचे नाव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
निमसाखर (ता. इंदापूर) येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर माजी सभापती विलास वाघमोडे, सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, महावीर गांधी, रणजित रणवरे, जयकुमार रणवरे, युवराज रणमोडे, लालासाहेब चव्हाण, महादेव घाडगे, सुभाष काळे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की आपली लढाई वाईट प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी आहे. विरोधक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. लोणीच्या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना संरक्षण नसल्यामुळे उद्योगांचे विस्तारीकरण होत नसून, बेरोजगारीत वाढ होत आहे. भाटघर धरणातील पाण्यावरती इंदापूरकरांचा हक्क असून खडकवासला धरणातील ४0 हजार एकरांच्या पाण्यावरती इंदापूरकरांचा हक्क आहे. हे पाणी कुठे जात आहे, असा प्रश्न या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केला.

नमसाखरला स्मशानभूमीसाठी ५ लाख ६0 हजार रुपयांचा निधी दिला असून, शेवटच्या माणसापर्यंत कामे पोहोचवल्यामुळे आम्हाला प्रसार आणि प्रचाराची गरज कधीही वाटत नाही. विरोधकांकडून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम होत आहे.
- करणसिंह घोलप
पंचायत समिती सभापती

Web Title: Harshavardhan Patil News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.