पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:43 PM2018-12-25T12:43:07+5:302018-12-25T12:49:57+5:30

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

hardworkout for Pune's water planning : Challenge to supply water till 15th July | पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देखडकवासला प्रकल्पात १८.२६ टीएमसीेच पाणीपरतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माणपालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.२४) केवळ १८.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.पालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती आहे.त्यामुळे पालिकेने ११५० एमएलडीपाणी वापरावे,अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे.परंतु,त्यावर कोणताही निर्णय होत  नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.
जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात २ ते २.५ टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सध्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात २४ डिसेंबर २०१५ रोजी १२.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता.मात्र,त्यावेळी पालिकेकडून मानसी ३०३ एलपीसीडी (दरडोई ) पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, २०१८ मध्ये मानसी ३५६ एलपीसीडी पाणी वापरले जात आहे.तसेच २४ डिसेंबर २०११ रोजी सुध्दा धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सध्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.
------------------------

उपलब्ध पाणीसाठा आणि वापरले जाणारे पाणी

पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे ७.५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल ९.५० ते १० टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे २ ते २.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र,शेतक-यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच १५ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.


खडकवासला धरण प्रकल्पाची २४ डिसेंबर रोजीची ८ वर्षांची आकडेवारी 
दिनांक         धरणसाठा 
२४/१२/२०११        १९.७२
२४/१२/२०१२        २०.१२
२४/१२/२०१३        २२.६८
२४/१२/२०१४        २२.०३
२४/१२/२०१५        १२.८८
२४/१२/२०१६        २१.८३
२४/१२/२०१७        २२.९६
२४/१२/२०१८        १८.२६
---------------------------------
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (१८.२६)
खडकवासला-१.१६,पानशेत- ७.२८,वरसगाव-९.६९,टेमघर -०.१३,

 

Web Title: hardworkout for Pune's water planning : Challenge to supply water till 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.