‘वो एक दौर था, और ये भी एक दौर है’ : हरभजन सिंगने उलगडले रहस्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 08:20 PM2018-05-07T20:20:53+5:302018-05-07T20:20:53+5:30

गेली 10 वर्षे मी मुंबई संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे मुंबईला देखील मी सॅल्युट करतो आणि आता चेन्नईवर देखील तेवढेच प्रेम करत आहे असे मत हरभजनसिंग याने व्यक्त केले.

Harbhajan Singh talks about his anger |  ‘वो एक दौर था, और ये भी एक दौर है’ : हरभजन सिंगने उलगडले रहस्य 

 ‘वो एक दौर था, और ये भी एक दौर है’ : हरभजन सिंगने उलगडले रहस्य 

Next

पुणे : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतातच. तरी देखील आपण आनंदी राहणे महत्त्वाचे असते. भारतीय संघाकडून खेळत असताना त्यावेळी मी देखील ‘अँग्री यंग मॅन होतो’, पण आता तसे नाही. ‘वो एक दौर था, और ये भी एक दौर है’ असे सांगत भारतीय संघाचा गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू हरभजनसिंग याने आपल्या रागाचे रहस्य उलगडले. पुण्यामध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त तो पत्रकारांशी बोलत होता. 

 

तो पुढे म्हणाला की, क्रिकेट सामन्याच्या दिवशी, ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे ठेवणे, तसेच 20-25 मिनिटांसाठी का होईना मजामस्तीचे मोहोल तयार करणे हा मुख्य उद्देश ठेवणे गरजेचे आहे. आमच्यावेळी आणि आत्ताही  भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप छान आणि रिलॅक्स असते. सध्या चेन्नईच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण सुद्धा असेच मजेशीर आहे. त्यामुळे आमचा खेळ उंचावत आहे असे गुपित त्याने उलगडले. मैदानावर खेळताना खेळाडू हा नेहमीच तणावात्मक वातावरणात वावरत असतो. फलंदाजी करीत असेल तर धावांचे दडपण असते तर क्षेत्ररक्षण करताना धावा रोखण्याचे दडपण असते. त्यामुळे मैदानाबाहेर तरी खेळाडूंनी तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे असल्याचे मत त्याने व्यक्त केले.यंदाच्या आयपीएलमध्ये मी चेन्नईकडून खेळत असलो तरी गेली 10 वर्षे मी मुंबई संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे मुंबईला देखील मी सॅल्युट करतो आणि आता चेन्नईवर देखील तेवढेच प्रेम करत आहे. सध्या चेन्नई संघामधील अंतर्गत वातावरण खुपच चांगले असून त्याचा परिणाम आमच्या सर्वांच्या खेळावर जाणवत असल्याचे हरभजनसिंग याने यावेळी सांगितले.

Web Title: Harbhajan Singh talks about his anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.