हॅप्पी बर्थ डे...अमिताभजी....! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 08:44 PM2018-10-11T20:44:51+5:302018-10-11T20:45:10+5:30

अमिताभ यांची सर्व गाणी कमाल आहेत. अभिनेता म्हणून तर त्यांना पूर्ण जग ओळखते. पण एक माणूस म्हणून ते उत्तम व्यक्तिमत्व आहे....पण त्यांचं चिमुकल्यांवर विशेष प्रेम...

Happy Birthday ... Amitabhji ....! | हॅप्पी बर्थ डे...अमिताभजी....! 

हॅप्पी बर्थ डे...अमिताभजी....! 

Next
ठळक मुद्देमहानायक अमिताभ बच्चन यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यांत कुठेही सापडतील. हे चाहते त्यांच्या लाडक्या बिग बी चा वाढदिवस भन्नाट कल्पना लढवून साजरा करतात. यात छोठे बच्चे कंपनी तरी मागे कसे बरं राहतील.. अशाच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांनी अरे दिवानो मुझे पहचानो, कहा से आया मै हूँ डॉन, देखा ना हाय रे सोचा ना हाय रख दि निशाने पे जान.. यांसारख्या अमिताभजींच्याच एकापेक्षा एक सरस सुपरहिट गाण्यांना सादर करत एव्हरग्रीन अभिनेते ’बिग बी’ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
साईनाथ मंडळ आणि आबासाहेब अत्रे प्रशाला यांच्या वतीने प्रशालेत महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गायक जितेंद्र भुरूक,कला दिग्दर्शक विनायक रासकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा,  मंडळाचे पदाधिकारी नितीन पंडित , अभिषेक मारणे, भाऊ आदमाणे, संकेत निंबाळकर, आदी उपस्थित होते. शाळेतील मुलांनी अमिताभजींचे मुखवटे आणि टोपी घालून त्यांच्या वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसा्च्या सोहळ्यात आबासाहेब अत्रे प्रशालेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. गायक जितेंद्र भुरूक यांनी बच्चनजींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची सुपरहिट गाणी सादर केली. गायक भुरूक यांनी गायलेल्या अमिताभजींच्या गाण्यावर सर्व विद्यार्थी डान्स करण्यात मग्न झाले होते.
अमिताभ यांची सर्व गाणी कमाल आहेत. अभिनेता म्हणून तर त्यांना पूर्ण जग ओळखते. पण एक माणूस म्हणून ते उत्तम व्यक्तिमत्व आहे. अमिताभजीनी आपल्या वागणुकीतून मोठेपणा जाणवू दिला नाही. ते सर्वांचा नेहमीच आदर करत असे. आपल्या आईवडिलांबद्दल दर वेळी आदरयुक्त प्रेम त्यांच्यामध्ये दिसून येत होते, असे अमिताभजींच्या मोठेपणाचे कौतुक गायक जितेंद्र भुरूक यांनी केले.
   कला दिग्दर्शक रासकर म्हणाले, मी अमिताभजींचा लहानपणापासूनच फॅन आहे. ते विचाराने मोठे असणारे व्यक्तिमत्व आहे. ते कुठल्याही गोष्टींचा नुसता विचार करत नाहीत तर त्याला आचरणात सुद्धा आणतात.

Web Title: Happy Birthday ... Amitabhji ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.