VIDEO: नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणार कोण?; हमीद दाभोलकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 12:52 PM2018-04-20T12:52:08+5:302018-04-20T12:52:08+5:30

दाभोलकरांचे मारेकरी मोकाट असल्यानं अंनिसची निदर्शनं

hamid dabholkar has rise question over narendra dabholkars murder investigation | VIDEO: नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणार कोण?; हमीद दाभोलकरांचा सवाल

VIDEO: नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणार कोण?; हमीद दाभोलकरांचा सवाल

Next

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात सर्वच यंत्रणा अपयशी ठरल्या असतील, तर मारेकरी पकडणार तरी कोण?, असा हताश सवाल हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला. दाभोलकरांच्या हत्येला साडेतीन वर्ष पूर्ण झाल्यावरही मारेकरी सापडलं नसल्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निदर्शनं करण्यात आली.

दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्याबद्दल उच्च न्यायालयानं तपास यंत्रणांवर ओढलेले ताशेरे गृह मंत्रालयासाठी आणि पोलीस दलासाठी शरमेची बाब असल्याचं हमीद दाभोलकर यांनी म्हटलं. मारेकरी म्हातारे झाल्यावर तुमच्याकडे येणार आहेत का?, असा प्रश्नही उच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना विचारल्याचं ते म्हणाले. यामुळे परदेशात भारताची बदनामी होत असून कोणीतरी मारेकऱ्यांना पाठबळ देत आहेत का?, असा सवालही त्यांनी विचारला.

Web Title: hamid dabholkar has rise question over narendra dabholkars murder investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.