पाण्याचे नियोजन करा- पालकमंत्री गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 02:17 AM2018-10-30T02:17:21+5:302018-10-30T02:17:34+5:30

चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Guardian Minister Girish Bapat | पाण्याचे नियोजन करा- पालकमंत्री गिरीश बापट

पाण्याचे नियोजन करा- पालकमंत्री गिरीश बापट

Next

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याबरोबरच जनावरांचा चाराप्रश्न गंभीर बनत आहे. चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शिरूर तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपट गावडे, सूर्यकांत पलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, जि. प. सदस्या रेखा बांदल, सभापती विश्वास कोहकडे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान जाधव, माजी सरपंच राम सासवडे, वाजेवाडीचे उपसरपंच अमित सोनवणे व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पाबळ, केंदूर, कान्हूरमेसाई, खैरेनगर, मिडगुलवाडी, धामारी शास्ताबाद, खैरेवाडी या गावात भीषण दुष्काळ राहणार असून या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाºयांना करण्यात आल्या. या वेळी प्रांताधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, महावितरणचे नितीन महाजन, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, फॉरेस्ट अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रब्बी हंगामाची पिके हाताला येऊन पिण्याचे पाणी गावांना मिळाले पाहिजे, अशा पद्धतीने चासकमान धरणाच्या पाण्याचे नियोजन करावे. पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. जनावरांसाठी चारा डेपो नियोजन करावे. आमदार वळसे पाटील यांनी अधिकाºयांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे. कायमस्वरूपी पाणीटंचाई असलेल्या पश्चिम भागातील गावात टंचाई निधीतून कायमस्वरूपी खात्रीचे पाणी मिळेल अशी योजना राबवावी, अशी सूचना केली.
- गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Guardian Minister Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.