जीएसटी सहायक आयुक्तांना ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:56 AM2018-03-22T03:56:20+5:302018-03-22T03:56:20+5:30

नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डरविरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

GST assistant commissioner arrested for accepting a bribe of 30 thousand rupees | जीएसटी सहायक आयुक्तांना ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक

जीएसटी सहायक आयुक्तांना ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक

Next

पुणे : नियमाप्रमाणे व्हॅट भरला असतानाही तक्रारदारांच्या असेसमेंट आॅर्डरविरुद्ध अपिलामध्ये न जाण्यासाठी जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद पुरुषोत्तम पाटील (वय ४८, रा़ प्रसादनगर, वडगाव शेरी) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
याबाबतची माहिती अशी : तक्रारदार हे काँट्रॅक्टर आहेत़ त्यांनी २०१३ मध्ये वानवडी येथे महापालिकेचे एक बांधकामाचे काम घेतले होते़ त्या वेळी सिव्हिल वर्क कामावर ५ टक्के व्हॅट होता़ त्याप्रमाणे हा कर तक्रारदारांनी भरलेला होता़ पंरतु, सहायक आयुक्त प्रसाद पाटील यांनी तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे़ तो ८ टक्केप्रमाणे भरायचा आहे़ त्याप्रमाणे तक्रारदार यांनी असेसमेंटची मागणी केली़ त्या वेळी पाटील यांनी तुम्हाला जरी अपील करायचे असेल तर त्यासाठी अगोदर उरलेला व्हॅट व दंड असे १७ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले़ जर यातून तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर ४५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली.

३० हजारांची लाच घेताना कारवाई
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़ तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी येरवडा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रंचला़ तक्रारदारांकडून त्यांना तेथील कँटीनमध्ये ३० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, एस़ एस़ घार्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ पाटील यांच्या वडगाव शेरी येथील घरामध्ये तपास सुरू आहे़

Web Title: GST assistant commissioner arrested for accepting a bribe of 30 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक