सत्ताधाऱ्यांना शेतक-यांच्या प्रश्नांविषयी अनास्था - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:12 AM2019-02-03T01:12:13+5:302019-02-03T01:12:17+5:30

‘दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतक-यांना ६ हजार रुपये देऊन, शेतक-यांना तुकडा देऊन, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतक-यांची चेष्टा करीत आहे.

Government is not serious about farmers issue - Sharad Pawar | सत्ताधाऱ्यांना शेतक-यांच्या प्रश्नांविषयी अनास्था - शरद पवार

सत्ताधाऱ्यांना शेतक-यांच्या प्रश्नांविषयी अनास्था - शरद पवार

इंदापूर - ‘दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतक-यांना ६ हजार रुपये देऊन, शेतक-यांना तुकडा देऊन, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतक-यांची चेष्टा करीत आहे. त्यामुळे राज्यात व शेतक-यांविषयी आस्था नसलेले सरकार आले आहे. शेतक-यांची अशी चेष्टा करणा-यांना आम्ही सोडणार नाही,’ असा टोला देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपा सरकारला लगावला.

इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सव-२०१९ च्या बक्षीस वितरण व व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. या वेळी माढा विधानसभा आमदार बबनदादा शिंदे, करमाळा आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने, मंगलसिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, शेतकºयांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे; मात्र या सरकारने शेतकºयांना अर्थसंकल्पात तुकडा देऊन भीक दिली आहे. आमचा शेतकरी भीक स्वीकारणार नसून, सन्मानाने जगणार आहे. या सरकारने शेतकºयांचे हाल केल्यामुळे देशाच्या इतिहासात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांची भाषणे झाली. यावेळी संचालक शिवाजीराव इजगुडे, पुणे जिल्हा परिषेदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, इंदापूर बाजार समितीचे सर्व संचालक व्यापारी, शेतकरी आदी मान्यवर व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती यशवंत माने यांनी आभार मानले.

आघाडी सरकारच्या काळात शेतकºयांच्या आत्महत्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करून, दहाच दिवसांत आम्ही ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली.

Web Title: Government is not serious about farmers issue - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.