हेअर बँड,हेअर क्लिप,कीचैनमधून सोन्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:46 PM2018-03-21T21:46:25+5:302018-03-21T21:46:25+5:30

महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ . दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़.त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़.

gold smuggling from Hair band, hair clip, Keychain | हेअर बँड,हेअर क्लिप,कीचैनमधून सोन्याची तस्करी

हेअर बँड,हेअर क्लिप,कीचैनमधून सोन्याची तस्करी

Next
ठळक मुद्देसीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर पकडला १७ लाखांचा ऐवज 

पुणे :  दुबईहून आलेल्या प्रवाशाने हेअर बँड, हेअर क्लिप आणि कीचैनमधून १७ लाख ५७ हजार रुपयांचे तस्करी करुन आणलेले सोने विमानतळ सीमा शुल्क विभागाने बुधवारी पकडले़.याप्रकरणी महंमद इरफान शेख (रा़ चिता कॅम्प, पथ सेंटरजवळ, ट्रॉम्बे,मुंबई) याच्यावर अवैधरित्या सोने आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. 
महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ .दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़. विमानतळावर ते ग्रीन चॅनेलमधून कोणतेही सीमा शुल्क न भरता ते बॅग असलेल्या ठिकाणी जात होते़ .त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़. त्यात एका बॉक्समध्ये फॅन्सी हेअर बँड, हेअर क्लिप, कीचैनमध्ये २४ कॅसेट सोने दडविल्याचे आढळून आले़. ५६६़.७८ ग्रॅम वजनाचे १७ लाख ५७ हजार १८ रुपये सोने जप्त करण्यात आले आहे़. विमानतळ सीमा शुल्क विभागाने सोने बुधवारी पकडले़. याप्रकरणी महंमद इरफान शेख (रा़ चिता कॅम्प, पथ सेंटरजवळ, ट्रॉम्बे, मुंबई) याच्यावर अवैधरित्या सोने आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, महंमद शेख याला हे सोने कोणी दिले होते व तो कोणाला देणार होता़ या तस्करीमागे कोण कोण आहेत, त्याचा तपास करण्यात येत आहे़. 


 

Web Title: gold smuggling from Hair band, hair clip, Keychain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.