सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:11 PM2018-06-28T21:11:13+5:302018-06-28T21:11:59+5:30

वटपौर्णिमेला लक्ष्य करून बुधवारी चोरट्यांनी शहरात धुडकुल घालत १३ महिलांच्या सोन्याच्या साखळ्यांची चोरी केली होती.

gold chain thieves escape shortly | सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले

सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले

Next
ठळक मुद्देपोलिसांचा पाठलाग अयशस्वी : एकूण १५ जबरी चोऱ्या

पुणे : वटपोर्णिमेचा मुहूर्त साधून बुधवारी संपूर्ण शहरात धुमाकूळ घालणारे मोटारसायकलवरील दोघे चोरटे नाकाबंदीत पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटण्यात यशस्वी ठरले़. त्यांनी बुधवारी दिवसभरात तब्बल १५ ठिकाणी महिलांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते़. 
लष्कर, शिवाजीनगर, सांगवी, वाकड, पाषाण करीत ते मार्केटयार्डला आले, तेथून कात्रज कोंढवा रोडवर गेले़. त्यानंतर त्यांनी घोरपडीतील आयप्पा मंदिरासमोर एक महिलेची सोनसाखळी हिसकावली़. तेथून ते २ ते ३ किलोमीटरवर असलेल्या रामटेकडीत शिरले़. तेथे एका महिलेचे मंगळसुत्र हिसकावून पुढे जात होते़. तोपर्यंत शहरात सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली होती़. संपूर्ण शहरात पोलीस चोरट्यांच्या शोधासाठी फिरत होते़ रामटेकडी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला ते संशयित दिसल्याने त्याने सर्वांना सतर्क केले़. एका मार्शलने त्याला पाठलागही केला़. मार्शलने त्यांच्या गाडीला धक्का दिला़. त्याने त्या चोरट्यांची गाडी डगमगली़. मात्र, त्यांना धक्का देणाऱ्या मार्शलचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली पडला़. ही संधी साधत ते सुसाटपणे पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे़. 
सोनसाखळी चोरटे इराणी असून त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांनी काही ठिकाणी पथके रवाना केली आहेत़. सीसीटीव्हीवरुन मिळालेल्या फुटेजची पडताळणी करुन त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़. 
घोरपडी येथील ३० वर्षांची महिला दुपारी पावणेतीन वाजता मुलीला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी पायी जात असताना मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली़. त्यानंतर काही अंतरावरील रामटेकडी येथील सतिश कसबे यांच्या कार्यालयासमोर आणखी एका महिलेचे दागिने हिसकावले़ रामटेकडी येथील ४० वर्षांची महिला वटपूजा करुन घरी पायी जात असताना दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून नेले़. हे दोन्ही गुन्हे बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले़. 

Web Title: gold chain thieves escape shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.