मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५०व्या स्थापनादिनानिमित्त औंधमध्ये गौरवशाली संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:05 PM2018-02-09T19:05:44+5:302018-02-09T19:13:45+5:30

शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणा-या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला.

Glorious conduction in Aundh by the Maratha Light Infantry's 250th Foundation Day | मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५०व्या स्थापनादिनानिमित्त औंधमध्ये गौरवशाली संचलन

मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५०व्या स्थापनादिनानिमित्त औंधमध्ये गौरवशाली संचलन

Next
ठळक मुद्देनिवृत्त लेफ्टनंट जनरल पद्मश्री महंमद अहमद झाकी यांनी परेड सोहळ्याची केली पाहणी ‘द बॉम्बे सिपाही’ नावाने झाली होती मराठा लाइट इन्फन्ट्री (काली पाँचवी)ची स्थापना

पुणे :  शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणाऱ्या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला. मराठा लाईट इंन्फट्रीचे निवृत्त लेफ्टनंट जनरल पद्मश्री महंमद अहमद झाकी यांनी परेड सोहळ्याची पाहणी केली. यावेळी जवानांनी त्यांना मानवंदना दिली. 
भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि एैतिहासिक परंपरा असलेली मराठा लाईट इन्फन्ट्री रेजीमेंटच्या स्थापनेला २५० पूर्ण झाली. यानिमित्त औंध येथील मिलीटरी स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संचलन सोहळ्यानिमित्त कोल्हापूरचे शाहू महाराज, लष्करातील तसेच बटालीयन मधील आजी माजी सैनिक या वेळी उपस्थित होते. परेडचे नेतृत्व कर्नल अजय मोहन यांनी केले.  
संचलनानंतर शहिदांना पुष्पचक्र वाहून मानवंदना वाहण्यात आली. यानंतर आजी माजी सैनिकांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यात बटालियनच्या सैनिकांनी जुन्हा आठवणींना उजाळा दिला.
महंमद अहमद झाकी म्हणाले, की मराठा लाईट इन्फन्ट्रीला गौरवशाली इतिहास आहे. मला या बटालियनचे नैतृत्व करण्याची ४० वर्ष संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. जवानांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन या बटालियनचे नाव उंचावले आहे. प्रत्येक लढाईत धाडसाने लढत  अनेक पदके जवानांनी या बटालीयनला मिळवून दिले आहे. ही परंपरा आजही कायम आहे.
शाहू महाराज म्हणाले, की माझे वडील छत्रपती शहाजी राजे हे ब्रिटीशांच्या सैन्यात सेंकड मराठा बटालियनमध्ये अधिकारी होते. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला होता. अफ्रिकेतील लढाईत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अशा या बटालियनचा इतिहास हा गौरवशाली आहे. यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल सतिश सातपुते आणि बिगेडियर वझे यांच्या हस्ते टपाल तिकीटाचे उद्घाटन करण्यात आले. 

ब्रिटीश अधिकाऱ्याच्या मुलाने दिला आठवणींना उजाळा
ब्रिटीशांच्या काळात मराठा लाईट इंन्फट्रीचे १९२२ ते १९४७ दरम्यान कमांडिंग आॅफिसर राहिलेले हॅरी पॉस यांचा मुलगा जेमी पॉस मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५० वर्धापनदिनानिमित्त लंडनवरून येऊन आवर्जून उपस्थित राहिले. लंडन येथे नागरी सेवेत असलेले जेमी पॉस यांनी यावेळी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजळा दिला. ईस्ट अफ्रिका तसेच बर्मामध्ये हॅरी पॉस यांच्या नेत्वृत्वाखाली मराठा सैनिक धाडसाने लढले. या पराक्रमाचे अनेक किस्से वडिलांकडून ऐकले असल्याचे सांगताने ते भावूक झाले होते. 

८५ वर्षाच्या माजी सैनिकाचा उत्साह
१९५२ मध्ये भारतीय लष्करात सिपाई म्हणून भरती झालेले ८५ वर्षीय निवृत्त सैनिक रामकृष्ण धावडे यांनी सेकंड मराठा सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाचवी) बटालियनचा नैत्रदिपक इतिहास सांगितला. मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी असलेल्या धावडे यांनी १९६५ च्या युद्धात सहभागी झाले होते. यात हुसेनीवाला आॅपरेशन मध्ये ते धाडसाने लढले. प्रतिकुल परिस्थितीत दगडी रस्ते तसेच डोंगर पार करत पाकिस्तानी सैन्यांची दाणादान उडवल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबर संयुक्त राष्ट्र संघाच्या पिस किपींग फोर्समध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. इजिप्तमध्ये गाजा पट्टीमध्ये संघर्ष सुरू असतांना ९ देशांच्या तुकड्यांमध्ये भारताच्या बाजूने ते सहभागी झाले होते. बोटीने प्रवास करत तेथील तणाव निवाळण्यासाठी या फोर्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९७० साली धावडे हे सैन्यातून निवृत्त झाले. त्यांचा मुलगाही सैन्यातून सुभेदार पदावरू निवृत्त झाले आहेत. 

पाकिस्तानी सैनिकांचा हल्ला परतवला
मराठा लाईट इन्फन्ट्रीचे १९८३ ते १९८६ दरम्यान, कमांडर राहिलेले कर्नल सुनील देशपांडे यांनी यावेळी १९६५ च्या युद्धातील बटालियनच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. देशपांडे म्हणाले, की भारत-पाकिस्तानच्या १९६५ च्या युद्धात मराठा बटालियन सोबत मला सहभागी होता आहे. या युद्धात हुसेनवाला पुलाचे रक्षण करणे आणि क्रांतीवीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचे समाधीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. तिप्पट संख्येने आलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा हल्ला नराठा बटालीयनच्या केवळ १ हजार सैनिकांनी परतावून लावला होता. यावेळी  माझ्या डोळ्यासमोर बटालियनचे कमांडिंग अधिकारी कर्नल लोलन तोफगोळा हल्ल्यात मारले गेल्याचे पाहिले. अभिनेता नाना पाटेकर यांच्यासोबत तीन महिने विचारमंथन करुन, समाजात सैनिकांचे कार्य पोहचविण्याकरिता ‘प्रहार’ चित्रपटातील जवानांच्या प्रशिक्षणाच्या दृश्यांबाबत ठरविण्यात येऊन त्याचे बेळगाव येथे चित्रीकरण झाले. मागील २२ वर्षापासून नागपूर येथे प्रहार प्रशिक्षण अकादमी सुरु केली असून त्यातून आतापर्यंत २७८ अधिकारी तिन्ही दलाल दाखल झाल्याचा आनंद आहे. 


१२ व्या मराठा लाईट इन्फन्ट्रीचे पहिले सीईओ होण्याचा मान माला मिळाला. याबरोबरच १९७९ ते १९८२ दरम्यान कमांड प्रमुख म्हणून मला काम करता आले. त्यावेळी माझ्या बटालियनाची पोस्टिंग गुलमर्ग सेक्टरला होती. पाकिस्तान सीमेवर प्रतिकुल परिस्थितीत डोंगररांगा सांभाळण्याचे जिकरीचे काम बटालियनने यशस्वीरित्या केले. त्यानंतर डेहराडून येथे बटालियन स्थलांतरित झाल्यावरही मी बटालियन सोबत कार्यरत होतो. 
- सतीश सातपुते, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) 

२५० वर्षांची गौरवशाली परंपरा
४ आॅगस्ट १७६८ ला सेकंड मराठा लाइट इन्फन्ट्री (काली पाँचवी)ची स्थापना ‘द बॉम्बे सिपाही’ नावाने झाली होती. सन १८४०च्या अफगाणिस्तानमधील काहून येथे झालेल्या युद्धात केलेल्या नेत्रदिपक कामगिरीमुळे या बटालियनला ‘लाइट इन्फन्ट्री’चा किताब मिळाला. दोन्ही जागतिक महायुद्धात या बटालियनच्या सैनिक सहभागी झाले होते. त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे अनेक गॅलंट्री अवॉर्ड बटालियनला मिळाले. स्वतंत्रानंतर बटालीयनची नेत्रदीपक कामगिरी सुरूच राहिली. १९६५च्या पाकिस्तान युद्धात बटालियनने फिरोजपूर जवळील हुसैनीवाला पुलाचे रक्षण केले. जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर येथील काऊंटर इन्सर्जन्सी आॅपरेशनमध्ये ही बटालियन सहभागी झालेली आहे. 

Web Title: Glorious conduction in Aundh by the Maratha Light Infantry's 250th Foundation Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.