चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणे सोळा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 09:15 PM2018-05-19T21:15:02+5:302018-05-19T21:15:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत माझी ओळख असून चित्रपटात नायिकेचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते

given work in cinema fraud with girl's of sixteen lakhs | चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणे सोळा लाखांची फसवणूक

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणे सोळा लाखांची फसवणूक

Next
ठळक मुद्देयुवतीकडून वेळोवेळी पैसे उकळून जवळपास १५ लाख ७० हजार रुपये रक्कम उकळली. युवतीने चित्रपटात काम मिळण्याविषयी चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे

पुणे : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने युवतीची पावणेसोळा लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार मधुकर देशमुख (वय २१, रा. श्वेतस्वप्न, शिवाजी चौक, बदलापूर, जि. ठाणे ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती धनकवडी भागात राहायला आहे. देशमुखचा वर्षभरापूर्वी या युवतीशी परिचय झाला होता. त्यावेळी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत माझी ओळख असून चित्रपटात नायिकेचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने युवतीकडून वेळोवेळी पैसे उकळून जवळपास १५ लाख ७० हजार रुपये रक्कम उकळली. 
दरम्यान,युवतीने चित्रपटात काम मिळण्याविषयी त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. युवतीने त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा देशमुखने युवतीला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत. 

Web Title: given work in cinema fraud with girl's of sixteen lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.