दरीत कोसळलेल्या तरुणाला झाडांनी दिले जीवदान , वानरलिंगी सुळक्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 03:22 AM2017-12-31T03:22:55+5:302017-12-31T03:23:09+5:30

आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला.

 Given the trees in the valley, the Ganga survivor, the harrowing incident in the harbor | दरीत कोसळलेल्या तरुणाला झाडांनी दिले जीवदान , वानरलिंगी सुळक्यावरील घटना

दरीत कोसळलेल्या तरुणाला झाडांनी दिले जीवदान , वानरलिंगी सुळक्यावरील घटना

Next

जुन्नर : आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. वन विभागाचे कर्मचारी तसेच जुन्नर येथील स्थानिक गिर्यारोहकांच्या ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या गिर्यारोहकाला सुरक्षित वाचविण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून शरण सावंत असे या जखमी गिर्यारोहकाचे नाव आहे.
जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसराच्या आदिवासी भागातील घाटघरजवळील जिवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोह येत असतात. शनिवारी सकाळी वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी भोर येथून आलेल्या प्रणय सावंत (वय १७) आणि शरण सावंत (वय २२) या दोन गिर्यारोहकांपैकी एक गिर्यारोहक शरण सावंत हा शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सुळक्यावर चढाई करत असताना २०० फूट खोल दरीत कोसळला. नशीबाची साथ होती म्हणून २०० फूट खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला.
वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर, पंधरा फूट उंचीवर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्याच्या हाताची पकड सैल झाली. यामुळे त्याचा हात निसटल्याने वानरलिंगी सुळक्याच्या पश्चिमेला बाजूला दोनशे फूट खोल दरीत कोसळला. त्या वेळी त्याचा भाऊ प्रणय सावंत याने मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळच्या हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याबाबत तातडीने जुन्नर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गिर्यारोहक असलेले वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना मदतीसाठी बोलवले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक रमेश खरमाळे, घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेन्डोसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहिदास आढारी, विनायक गोसावी, अक्षता मांढरे, तेजस पोटे, गौरव कांबळे या बचाव पथकाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर या गिर्यारोहकाला वाचविले. या गिर्यारोहकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

Web Title:  Given the trees in the valley, the Ganga survivor, the harrowing incident in the harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.